Poonam Rajput replaces Urvashi Sharma in Tenali Rama | तेनाली रामा या मालिकेतील उर्वशी शर्मा घेणार प्रेक्षकांचा निरोप, तिची जागा घेणार ही अभिनेत्री
तेनाली रामा या मालिकेतील उर्वशी शर्मा घेणार प्रेक्षकांचा निरोप, तिची जागा घेणार ही अभिनेत्री

मालिकांमध्ये कलाकारांची रिप्लेसमेंट होणे यात काही नवीन नाही. आता प्रेक्षकांना तेनाली रामा या मालिकेत एक रिप्लेसमेंट पाहायला मिळणार आहे. तेनाली रामा या मालिकेत प्रेक्षकांना नुकताच एक बदल पाहायला मिळाला होता. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रियंवदा कांतने नुकताच या मालिकेला रामराम ठोकला होता. या मालिकेत तिची जागा निया शर्माने घेतली होती. प्रियंवदानंतर आता या मालिकेतील आणखी एक अभिनेत्री प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत जग्नमोहिनीची भूमिका उर्वशी शर्मा साकारते. पण आता ती ही मालिका सोडत असून जग्नमोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पूनम राजपूतला पाहायला मिळणार आहे. 

उर्वशी तेनाली रामा ही मालिका का सोडत आहे याबद्दल तिने मौन राखणेच पसंत केले आहे. उर्वशीची जागा आता पूनम घेणार असून ती छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजवर ना बोले तुम ना मैंने कुछ कहा, सीआयडी आणि कोड रेड यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तेनाली रामा या मालिकेत काम करण्यासाठी पूनम खूपच उत्सुक असल्याचे कळतेय. 

सोनी सबवरील 'तेनाली रामा' ही मालिका प्रेक्षकांची अतिशय आवडती आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर पकड घेतली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहेत. रामा तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या मालिकेत कृष्‍णा भारद्वाज, मानव गोहिल यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत असून प्रेक्षकांना त्यांचा अभिनय खूप आवडत आहे.

तेनाली रामा या मालिकेमध्‍ये रामा नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेला असतो. पण त्‍यातूनही तो मार्ग काढतो असे आपल्याला पाहायला मिळते. तेनालीचा हा गुण प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. तसेच तो आपली विनोदी वृत्‍ती आणि कृष्‍णदेवराय प्रती असलेल्‍या प्रामाणिकपणामुळे दर्शकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. ही मालिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सांगत असतात. 


 


Web Title: Poonam Rajput replaces Urvashi Sharma in Tenali Rama
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.