Pooja Bedi looks with her beloved Priyakara | पूजा बेदी दिसली तिच्या या पूर्वप्रियकरासोबत

पूजा बेदी जो जिता वही सिकंदर या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. पूजा बेदी ही बोल्ड अॅक्टर्स म्हणूनच ओळखली जाते. तिने जो जिता वही सिकंदर या चित्रपटाप्रमाणेच विषकन्या, लुटेरे, फिर तेरी कहानी याद आयी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावरही तिने तिची एक जागा निर्माण केली आहे. झलक दिखला जा, बिग बॉस, फिअर फॅक्टर, नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. पूजा बेदी तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा नेहमीच वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असते. 

pooja bedi akashdeep saigal

पूजा बेदीचे फरहान फर्निचरवाला सोबत लग्न झाले होते. पण लग्नाच्या काहीच वर्षांत त्या दोघांनी घटस्फोट घेतला. पूजा आणि फरहान यांना दोन मुले आहे. घटस्फोटानंतर पूजाची अनेक अफेअर गाजली. तिचे कोरिओग्राफर हनिफ हिलाल आणि अभिनेता आकाशदीप सेहगल यांच्या सोबतचे प्रेमप्रकरण तर चांगलेच गाजले होते. आकाशदीप आणि तिची ओळख बिग बॉसच्या घरामध्ये झाली होती, बिग बॉस संपल्यानंतर देखील त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहायला मिळाले होते. ते अनेक पार्टी, समारंभात एकत्र असायचे. पण दरम्यानच्या काळात त्यांच्यात काही मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण नुकतेच पूजा आणि आकाशदीप यांना एकत्र पाहाण्यात आले. एका पार्टीत दोघांनी हातात हात घालून एंट्री केली. या सगळ्यामुळे या दोघांमध्ये पुन्हा अफेअर सुरू झाले का अशा चर्चा सुरू होत्या. पण आकाश आणि पूजा मध्ये सध्या केवळ मैत्री असल्याचे पूजाने स्वतः सांगितले आहे. पूजाने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, माझ्या सगळ्याच पूर्वप्रियकरांसोबत माझे खूपच चांगले मैत्रीचे संबंध आहेत. आकाश हा खूप चांगला व्यक्ती आहे. आम्ही नुकत्याच एका पार्टीत एकत्र होतो. कारण आजही आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री आहे. पण मैत्री पेक्षा अजून काहीही आमच्या नात्यात नक्कीच नाहीये. 

Also Read : आपल्या अटींवर जगतेय पूजा बेदी! आजही तितकीच बोल्ड अन् ग्लॅमरस!!
Web Title: Pooja Bedi looks with her beloved Priyakara
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.