Political comedy entertains viewers ...! | राजकीय कॉमेडी दर्शकांना भावतेय...!

प्रसिद्ध स्टॅण्ड-अप कॉमेडियन तथा विनोदी लेखक राजीव निगम यांचा एक शो राजकीय विडंबन आणि नेत्यांवरील तिरकस शेरेबाजी यामुळे दर्शकांना खूपच भावतोय. राजीव यांनी आतापर्यंत अनेक कॉमेडी शोमधून दर्शकांना लोटपोट केले आहे.त्यांच्या या सध्याच्या शोबाबत आणि आतापर्यंतच्या प्रवासाबाबत त्यांच्याशी सीएनएक्सने मारलेल्या मनसोक्त गप्पा.

* या शोचे खास वैशिष्टे काय आहे?
- या शोचे सर्वात खास वैशिष्टे म्हणजे सध्या राजकारणात जे घडत आहे, ते तसेच मात्र कॉमेडी स्वरुपात बघावयास मिळत आहे, म्हणून दर्शकांना खूपच मजा येत आहे. शिवाय हा युनिक शो असून त्याला खूप प्रतिसादही मिळत आहे. यावरुन दर्शकांचे मनोरंजन होत असल्याचे समजतेय. 

* तुम्हाला या शोमध्ये काम करावेसे का वाटले?
- गेल्या पंधरा-वीस वर्षात ठराविक असा कॉमेडी शो आलाच नाही. संपूर्ण नियोजनात्मक अशा शोची जागा रिकामी होती. ती जागा या शोने भरू न काढली, म्हणून हा शो स्वीकारला आणि काम करताना खूप मजाही येत आहे. 

* तुम्ही कॉमेडी करताना तयारी कशी करता?
- जेवढा मसाला भारतात आहे, तेवढा कुठेच नाही. संध्याकाळी जेव्हा आपण विविध न्यूज चॅनेल पाहता, तेव्हा त्यात किती मसाला पाहावयास मिळतो. रोजच काहीना काही घडत असतं आणि या अगोदरही बरेच काही घडून गेले आहे. हेच विषय माझी तयारी करुन देतात. 

* रोजचे घोळ, भ्रष्टाचार यामुळे राजकारणाला सुज्ञांकडून तटस्थपणे पाहिले जाते,तुमचे मत काय आहे?
- फक्त राजकारणातच घोळ, भ्रष्टाचार नाहीत, तर प्रत्येक क्षेत्रात हे चित्र बघावयास मिळते. प्रत्येक क्षेत्रात हा घोळ कमी-जास्त प्रमाणात बघावयास मिळत आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीदेखील स्वत:शी प्रामाणिक नाहीय. तो कुठे आपले कर्तव्य प्रामाणिक बजावतोय?

* आपल्या आगामी करिअरच्या बाबतीत काय विचार केला आहे?
- सध्यातरी अ‍ॅक्टिंग आणि रायटिंगबाबतच विचार केला आहे.आजपर्यंत बरेच कॉमेडी शोचे लेखन केले आहे. त्यानंतर स्टॅण्ड-अप कॉमेडी करायला लागलो. त्यात चांगले यश मिळाले आहे. म्हणून हे दोन्ही क्षेत्र करिअरच्या दृष्टिकोनाने माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. 
Web Title: Political comedy entertains viewers ...!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.