'दिव्य दृष्टी' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेची कथा दिव्या आणि दृष्टी या दोन जुळ्या बहिणींभोवती फिरते. या दोघींकडे एक एक विशेष शक्ती असते आणि ती प्राप्त करण्यासाठी पिशाचिनी ही दुष्ट हडळ प्रयत्नशील असते. पिशाचिनीची भूमिका नामवंत अभिनेत्री संगीता घोष साकारीत आहे. सना आणि नीराच्या रूपातील बदलानंतर आता तुम्हाला पिशाचिनीच्या रूपातील बदल पाहून धक्काच बसेल. आतापर्यंत आपल्या सुंदर आणि ग्लॅमरस पोशाखांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडलेली पिशाचिनी आता आगामी भागात एका वेगळ्याच अवतारात प्रेक्षकांना दिसेल.

संगीताची व्यक्तिरेखा कोणालाही हेवा वाटेल अशीच आहे. तिला या व्यक्तिरेखेच्या स्वभावातील वेगवेगळ्या छटा तर व्यक्त करायला मिळणारच आहेत, शिवाय तिला मालिकेतील कोणत्याही व्यक्तिरेखेच्या तुलनेत सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस पोशाख परिधान करण्यास मिळणार आहेत. खलनायिकेची व्यक्तिरेखा करताना कोणालाही वेगवेगळ्या प्रकारचे लूक साकारायला मिळतात आणि संगीता घोष हे त्याचे एक उदाहरण आहे. आतापर्यंत पिशाचिनी नेहमीच वेगवेगळ्या फॅशनेबल कपड्यांमध्ये दिसली असली, तरी आता ती एका अगदी वेगळ्याच पोशाखात दिसेल.


आगामी भागात पिशाचिनी शेरगिल हाऊसमध्ये प्रीतो या नावाने प्रवेश करणार असून त्यावेळी तिने नेत्रदीपक पंजाबी सूट घातलेले असतील. आपल्या पंजाबी रूपाला शोभेल असे लांब, लोंबणारे कानातील ईअरिंग्ज, रंगीत फुलकारी दुपट्टे आणि वेणीला रिबिन लावून ती खरीखुरी पंजाबी कुडी दिसणार आहे. आपल्या या नव्या पंजाबी रूपावर संगीता एकदम खुश झाली होती. 


ती म्हणाली, “या मालिकेत विविध रूपं घेण्यास मी खूपच उत्सुक असते कारण यात मला वेगवेगळे आणि फॅशनेबल कपडे तर घालायला मिळतातच, पण या भूमिका माझ्यातील अभिनेत्रीलाही आव्हान देत असतात. मला यातील प्रीतोचा लूक फारच भावला आहे. तिची विरोधाभासी रंगीत वेशभूषा तिच्या स्वभावाशी अचूक जुळणारी आहे. यात ती नवनव्या फुलाफुलांच्या डिझाईनमधील पोशाखात दिसेल!”

ती म्हणाली, “प्रीतोची व्यक्तिरेखाही पिशाचिनीइतकीच मादक आहे. मला ही भूमिका साकारताना खूपच मजा येत आहे.”


Web Title: PISHACHINI SANGITA GHOSH DONS A PUNJABI AVATAR IN ‘DIVYA DRISHTI’
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.