Photographer became Kunal Jaisingh on the sets of 'Ishqbaz' | ‘इश्कबाझ’च्या सेटवर कुणाल जयसिंह बनला छायाचित्रकार

अभिनेत्यांना अभिनयाखेरीजही काही अन्य छंद असू शकतात आणि कुणाल जयसिंह हाही त्याला अपवाद नाही. ‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ या मालिकेत ओंकारसिंह ओबेरॉयची भूमिका रंगविणारा हा अभिनेता आपले चित्रीकरण नसेल, तेव्हा आपला हा छंद पूर्ण करीत असताना दिसतो.कुणालला छायाचित्रे काढण्याची आवड पूर्वीपासूनच होती आणि तो सेटवर आपल्यासोबत नेहमी आपला ‘डीएसएलआर’ हा व्यावसायिक कॅमेरा जवळ बाळगतो. तो चित्रीकरण करीत नसला, तर तो आपल्या सहकलाकारांची विविध छायाचित्रे काढताना दिसतो.मालिकेचा सध्याचा कथाभाग बघता, सर्व कलाकार सध्या एकत्रच चित्रीकरण करताना दिसतात.जेव्हा एखाद्या प्रसंगाचे चित्रीकरण होते, त्यानंतर ते एकत्र बसून आपली छायाचित्रे काढतात- अर्थातच कुणाल जयसिंहच्या सौजन्याने मालिकेतील कुणालची पत्नी श्रेणू परिख ऊर्फ गौरीकुमारी शर्मा सांगते, “मला कुणालची छायाचित्रं फार आवडतात. एके दिवशी त्याने मला त्याने काढलेली विविद छायाचित्रं दाखविली होती आणि त्याच्या दुस-या दिवसापासूनच तो सेटवर आपला कॅमेरा घेऊन येऊ लागला. त्याचा (कॅमेरा) वापर करून त्याने काढलेली छायाचित्रे अप्रतिम आहेत.”यावर कुणालने सांगितले, “मला पूर्वीपासूनच छायाचित्रं काढण्याची अतिशय हौस आहे. माझं तांत्रिक ज्ञानही ब-यापैकी असून मी नेहमी अधिकाधिक तंज्ञत्रानात गुंतवणूक करीत असतो. हा माझा छंद असला, तरी आजकाल माझ्या फावल्या वेळेत मी त्याचा पुरेपूर वापर करीत असतो. ‘इश्कबाझ’मधील माझ्या सहकलाकारांनीही माझ्या या छंदाला चांगला प्रतिसाद दिला आहे.”


Also Read:‘इश्कबाझ’मध्ये सुरभी चंदनाची दुहेरी भूमिका!


मालिकेतील शिवायसिंह ओबेरॉय (नकुल मेहता) आणि अन्निका (सुरभि चंदना) या जोडप्यातील प्रेम आणि सामंजस्याचे नाते हे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनले होते.या मालिकेच्या विद्यमान कथाभागाला लवकरच एक जबरदस्त वळण लागणार आहे. शिवायसिंहला आपली पत्नी अन्निकाची गोळी मारून हत्या करतो, असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण इथे त्यांच्या प्रेमकथेचा अंत होत नाही; कारण आमच्या असे कानावर आले आहे की प्रेक्षकांना यापुढचा धक्का देण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे. तो म्हणजे, सुरभि चंदनाला लवकरच दुहेरी भूमिकेत सादर केले जाणार आहे. दुहेरी भूमिकेत सुरभि अन्निकाचीच भूमिका साकारणार असून तिच्यासारखी दिसणारी दुसरी अन्निका ही मात्र तिच्या स्वभावापेक्षा अगदीच भिन्न असेल.
Web Title: Photographer became Kunal Jaisingh on the sets of 'Ishqbaz'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.