This photo of Karan Mehra's prince is getting viral | करण मेहराच्या राजकुमारचा हा फोटो होतोय व्हायरल

'ये रिश्ता क्या कहेलाता है' या मालिकेतील नैतिक म्हणजेच करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल काही दिवसांपूर्वी पालक बनले आहेत. 14 जूनला त्यांच्या आयुष्यात एका गोंडस बाळाचं आगमन झालं. सध्या हे दाम्पत्य आपल्या आयुष्यातील हे सुंदर क्षण एन्जॉय करत आहे. दोघांच्या जीवनात आगमन झालेल्या राजकुमाराच्या एंट्रीनं त्यांचं जगणं सुंदर बनलंय. त्यांनी आपल्या राजकुमाराचं नाव कविश असं ठेवलं आहे.नुकतंच करण आणि निशानं कविशचे गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या देशभरात रक्षाबंधन या सणाचा उत्साह आहे. बहिण आपल्या भावाला राखी बांधत हा सण साजरा करते. या फोटोमध्येही एक चिमुकली कविशला राखी बांधत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नेटिझन्स आणि फॅन्सना कविशचे फोटो पसंत पडत आहेत. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. कविशचा हा पहिलाच रक्षाबंधन सण आहे. त्यामुळे नैतिक आणि त्याची पत्नी निशा याबाबत खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या लेकाला म्हणजेच कविशलाही बहिणीचं प्रेम मिळावं म्हणून त्यांनी खास पद्धतीने रक्षाबंधनचा सण साजरा केला. या खास सेलिब्रेशनमुळे नैतिक आणि निशा या दाम्पत्यासाठी रक्षाबंधनचा आनंद द्विगुणित झाला आहे.करणने अभिनेता निशा रवाळशी 2012मध्ये लग्न केले आहे. त्या दोघांची ओळख हसते हसते या मालिकेच्या सेटवर झाली होती. निशाला पाहताच क्षणी करण तिच्या प्रेमात पडला होता. सहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले. निशा आणि करणचे हे पहिलं आपत्य आहे.निशाचा आपल्या राजकुमारसह असलेल्या या फोटोला खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहे. निशा आणि करणनेही आपल्या चाहत्यांचे प्रेम आपल्या मुलालाही मिळत असल्याचे सांगत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
Web Title: This photo of Karan Mehra's prince is getting viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.