This person is special in Sapna Chaudhary's life, know some unknown facts | सपना चौधरीच्या आयुष्यात ही व्यक्ती आहे स्पेशल,जाणून घ्या काही Unknown Facts

बिग बॉसमुळेच सपनाचेही अनेक चाहते बनले आहेत. आतापर्यंत हरियाणापूर्तीच मर्यादित असलेली सपनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे  प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. तिचं सध्या काय सुरु आहे,ती कोणत्या व्यक्तीबरोबर फिरत आहे अशा सगळ्या गोष्टींची याबाबत माहिती घेण्याची तिच्या फॅन्सना उत्सुकता असते. आज लाखो फॅन्सला तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावरील  सपनाचा एक फोटो सध्या सा-यांसाठीच चर्चेचा विषय ठरतो.विशेषतः तिच्या फॅन्ससाठी सपनाचा हा फोटो उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या फोटोत एका व्यक्तीबरोबर असल्याचे पाहायला मिळत आहे.आता फोटो नेमका कधीचा आणि कसला आहे अशा चर्चा सुरु आहेत. या फोटोचं वास्तव काय असे अनेक प्रश्न सध्या सपनाच्या फॅन्सना पडले आहेत.तर सपनाबरोबर दिसणारा व्यक्ती हा वीरपाल हरियाणवी सिंगर आहे.वीरपालने  सपना चौधरीसोबत  अनेकदा स्टेज शोही केले आहेत. सपना, वीरपालला आपला गुरुही मानते.त्यामुळे सपनाच्या आयुष्यात वीरपालचे खास स्थान आहे.

सपना चौधरी बिग बॉस-11 मधून बाहेर पडल्यानंतर हरियाणामध्ये पोहोचली आणि पुन्हा डान्स शो सुरु केले आहेत. त्यासोबतच सपनाला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली आहे.सपना ‘नानू की जानू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभय देओल तिच्या अपोझिट असेल. सध्या अभय आणि सपना शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.इतकेच नव्हे तर रेमो आणि जॅकलिन फर्नांडिस हे दोघे ‘रेस3’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस11’च्या घरात पोहोचले होते. यादरम्यान घरातील स्पर्धकांना काही टास्कही करायचे होते.डान्सची वेळ आल्यावर सगळ्यांनीच सपनाचे नाव घेतले. सपनाने रेमोच्याच ‘अ फ्लार्इंग जट्ट’च्या ‘बिट पे बुटी’ या लोकप्रीय गाण्यावर डान्स केला. सपनाचा डान्स पाहून रेमो इतका प्रभावित झाला की, त्याने लगेच तिला ऑफर देऊन टाकली. तू इतकी चांगली डान्सर आहेस तर तुझ्यासोबत काम करणे तर बनतेच, असे रेमो सपनाला म्हणाला. सपनासाठी हा गोड धक्का होता.

Web Title: This person is special in Sapna Chaudhary's life, know some unknown facts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.