The performer performs with celebrity singers in 'Voice India Kids' | 'व्हॉइस इंडिया किड्स’मध्ये सेलिब्रिटी गायकांसोबत स्पर्धक करणार परफॉर्म

लोकप्रिय संगीत रिअॅलिटी शो, व्हॉइस इंडिया किड्स सीझन २ हा ग्रँड फिनालेपर्यंत पोहचायला फक्त काही एपिसोडच बाकी आहेत आणि वातावरण अधिकच उत्सकतापूर्ण होत चालले आहे. आता काही दिवसांतच संपूर्ण देश त्यांनी निवडलेल्या,त्यांच्या पसंतीच्या आवाजात हरवून जाईल.टॉप सहा स्पर्धकांची थोडीशी मजा घेण्यासाठी, सेलिब्रिटी गेस्ट गायिका नेहा भसिन, शिल्पा राव,आकृती कक्कर व दिव्या कुमार हे येत्या एपिसोडमध्ये त्यांच्यासोबत असणारच आहेत. शिवाय, जोडीने त्यांच्यासोबत  परफॉर्मसुद्धा करतील.प्रेक्षकांना येत्या भागात, आमचे प्रतिभाशाली स्पर्धक, इंडस्ट्रीतील प्रख्यात गायकांच्या बरोबरीने करणार  असलेल्या दुहेरी प्रदर्शनाचा (परफॉमरन्स) आनंद लुटता येईल. फार कमी वेळात लोकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या ह्या तरुण गायकांकडून बॉलिवुडची चार्टबस्टर गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील.आकृती कक्कर मनशीसह परफॉर्म करताना दिसेल, दिव्या कुमार निलांजनासोबत तर नेहा भसिन फाझिल व श्रुतीसोबत जोडीने परफॉर्म करणार आहेत. शिल्पा राव ही गुणता आणि शकीनाह यांच्यासह मंच गाजवणार आहे.ह्या शोविषयी बोलताना दिव्या कुमार म्हणाली की, “व्हॉइस इंडिया किड्सचा भाग होणे ही भावना फार आनंद देणारी आहे.निलांजनासोबत परफॉर्म करतानाचा अनुभव ग्रेट होता. इतर स्पर्धकही  प्रचंड हुशार आहेत. प्रतिभेचा मुद्दा येतो तेव्हा आपला देश किती श्रीमंत आहे हे त्यांनी अलीकडेच दाखवून दिले आहे”. ह्याला जोडून आकृती कक्कर म्हणाली की, “ह्या मंचावर पुन्हा येणे हे अप्रतिम वाटत होते. मी इथे मागच्या वर्षीसुद्धा आले होते.आणि ह्या लहान मुलांचा इतका कमालीचा आवाज होता की वेळोवेळी मला सुखद धक्के देत होता. मला नाही वाटत की असा एखादा संगीताचा प्रकार (genre) शिल्लक असेल जो त्यांनी हाताळला नसेल.आमचे करिअर घडवून आणण्यात आमच्या प्रशिक्षकांनी आम्हांला नेहमीच खूप मदत केली आणि ह्या मुलांसोबतसुद्धा ते अगदी हेच करत आहेत.
Web Title: The performer performs with celebrity singers in 'Voice India Kids'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.