Pathakala set for 'Aishwishan Bhav' for Tisha Kapoor! | तिशा कपूरसाठी ‘आयुष्यमान भव’चा सेट ठरला पाठशाळा!

‘आयुष्यमान भव’ या मालिकेत काव्या ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री तिशा कपूर सध्या काही अनुभवी आणि ज्येष्ठ कलाकारांकडून अभिनयाचे धडे गिरवत आहे.ज्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट आणि मालिकेत आपले विशेष स्थान निर्माण केले आहे आणि ज्यांच्याकडे होतकरू कलाकार आदराने बघतात अशा सुधा चंद्रन,सविता प्रभुणे, मनीष गोयल यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याबद्दल तिशा स्वत:ला नशीबवान समजते.तिशा म्हणाली,“मी या ज्येष्ठ कलाकारांकडून खूप काही शिकले.त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष भूमिका साकारताना मला जे काही शिकायला मिळालं, ते मला कोणत्याही अभिनयाच्या शाळेत शिकायला मिळालं नसतं. हे सर्व दिग्गज कलाकार इतकी वर्षं या क्षेत्रात असले, तरी त्यांचा अभिनयाप्रती असलेला दृष्टीकोण पाहून मी थक्क झाले.मी त्यांचे काम नीट लक्ष देवून पाहते मुळात  बारकाईने अभ्यास करते असे म्हणणं चुकीचे ठरणार नाही.त्यांचे काम पाहून मी देखील माझे काम करण्याचा प्रयत्न करते. सेटवरचा प्रत्येक दिवस मला नवं काहीतरी शिकवून जातो.मला ‘आयुष्यमान भव’च्या टीमचा भाग बनता आलं,याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते.”या कार्यक्रमात सुमीत भारद्वाज हा तिच्या नायकाच्या भूमिकेत आहे.

तिशा कपूरप्रमाणेच रिकी पटेल हा बालकलाकार देखील याच मालिकेच्या सेटवर त्याचा शाळेतला अभ्यास पूर्ण करतो. इतकचे नव्हेतर मालिकेच्या कामामुळे त्याचे शालेय शिक्षणात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये म्हणून शिक्षकच सेटवर येवून त्याला शिकवणी देतात.रिकी सकाळी शाळेत जातो आणि संध्याकाळी सेटवर येतो.दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा तो प्रयत्न करत असतो. या मालिकेचे सर्व टीमही त्याला त्याच्या अभ्यासात मदत करत असल्याचे त्याने म्हटले आहे.रिकीने मालिकेत क्रिशची भूमिका साकराली होती.रिकीने 'दिया और बाती हम' या मालिकेत तर 'जोधा अकबर' या  सिनेमात तो झळकला आहे. यानंतर तो 'इंतेकाम एक मासूम' या मालिकेतही तो झळकला होता.इतकेच नसून सलमानच्या 'ट्युबलाईट' सिनेमातही रिकीला संधी मिळाली होती. 
Web Title: Pathakala set for 'Aishwishan Bhav' for Tisha Kapoor!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.