Partner Trouble Has Double, Complete 100 Parts of the Series, Entry in the Neha Pendsec series | ​पार्टनर ट्रबल हो गई डबल या मालिकेचे १०० भाग पूर्ण, आता होणार नेहा पेंडसेची मालिकेत एंट्री

पार्टनर ट्रबल हो गई डबल या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले आहेत. आता मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार असून चमकूच्या येण्याने पार्टनर्सच्या आयुष्यातील अडचणी दुप्पट नाही तर तिप्पट होणार असल्याचे दिसत आहे. चंद्रकला चकोरी ऊर्फ चमकूच्या भूमिकेत सोनी सबच्या पार्टनर्स – ट्रबल हो गयी डबलमध्ये लवकरच अतिशय प्रतिभाशाली आणि सुंदर नेहा पेंडसे दिसणार आहे. मध्यप्रदेशमधील एका गावातील एकदम ‘देसी पटाका’ अर्थात एकदम आग पण तरीही गोड आणि निष्पाप अशा मुलीची भूमिका ती साकारणार आहे. जॉनी लिव्हरने साकारलेल्या आयुक्त गोगोलची पुतणी म्हणून ती पोलीस मुख्यालयात प्रवेश करणार असून त्याच्या रोजच्या कामकाजात ती इतर अधिकाऱ्यांसह त्याला सहाय्यक म्हणून मदत करणार आहे. इतकेच नाही, तर तो तिला पोलिसांच्या जागेत राहण्यासाठीदेखील परवानगी देणार आहे. तिचे तिथे येणे हे थोडे विचित्र आहे आणि शिवाय तिचा येण्याचा हेतूदेखील अजून नीटसा कळलेला नाही. त्यामुळे आदी (विपुल रॉय) आणि मानव (किकू शारदा) नेहमीच तिच्यावर लक्ष देणार आहेत. 
लोकांकडून काम करवून घेण्यासाठी चमकू नेहमीच आपल्या सौंदर्याचा अगदी हेतूपूर्वक उपयोग करून घेत असते आणि ती खूप मस्तीखोरदेखील आहे. गावातून आल्यामुळे ती तिला अगदी स्वतःला अडाणी आणि साधी भासवत असते. तिचे बोलणे जरी काहीसे उद्धट वाटले तरी ती अनावधानाने बोलते आणि त्यात वाईट हेतू काहीच नसतो. या व्यक्तिरेखेविषयी नेहा सांगते, “मालिकेतील चंद्रकला हे पात्र सध्याच्या कथेसाठी अगदी साजेशे आहे. माझ्या पात्राभोवती खूपच रहस्यमयता असून माझा मालिकेतील प्रवेश माझी ओळख आणि उद्देशासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढविण्यासाठी प्रेक्षकांना मी भाग पाडणार आहे. मी अतिशय खोडकर, उत्साही मुलीची भूमिका या मालिकेत साकारत आहे, जी इतर लोकांचे आयुष्य आपल्या वागण्याने दुःखद बनविते. हे अतिशय मजेशीर पात्र असून जॉनी लिव्हर, विपुल रॉय आणि किकू शारदा यांच्यासह काम करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.”

Also Read : स्लिम दिसण्यासाठी नेहा पेंडसेने केल्या या गोष्टी?जाणून घ्या फिटनेसचे Daily Routine
Web Title: Partner Trouble Has Double, Complete 100 Parts of the Series, Entry in the Neha Pendsec series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.