Parni Narayan in Pia Albale and turn of puja | ​पिया अलबेलामधील नरेन आणि पूजाच्या नात्याला मिळणार वळण

पिया अलबेला ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. खूपच कमी वेळात या मालिकेतील नरेन आणि पूजा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. या मालिकेतील नरेनच्या भूमिकेत अक्षय म्हात्रेला तर पूजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना शीना दासला पाहायला मिळत आहे. या मालिकेने आता काही वर्षांचा लीप घेतला असून या मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळाले आहे. हे वळण देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आता नरेनने जुन्या गोष्टी विसरून पूजाला घरी आणून व्यास परिवारासोबत तिची भेट घडवून दिली आहे. पूजाला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी नरेन शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. आता मालिकेच्या आगामी भागात नरेन आणि पूजा नव्याने प्रेमात पडणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या लग्नानंतरच्या वैवाहिक आयुष्याला ते सुरुवात देखील करणार आहेत. फुलांच्या पाकळ्‌यांनी सजवलेला पलंग, प्रणयी वातावरण नरेन आणि पूजाच्या नात्याला आणखीनच दृढ बनवणार आहे. पण त्यांचे हे प्रेम खूपच कमी काळासाठी टिकणार आहे. कारण नरेनच्या मनात कदाचित काहीतरी वेगळेच सुरू आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याच्याविषयी शंका निर्माण होणार आहे. याविषयी शीन दास सांगते, “पुन्हा पुन्हा पूजाची परीक्षा नरेनकडून घेण्यात येत आहे आणि प्रत्येक वेळेस त्याचा विश्वास जिंकण्यामध्ये ती यशस्वी ठरत आहे. जस जशी मालिकेची कथा पुढे सरकेल, तस तसे पूजाचे नरेनसाठीचे प्रेम वाढतच जाईल आणि ते एकमेकांच्या खूपच जवळ येतील. नरेनच्या कटाला ती पुन्हा एकदा बळी पडेल. हा सीक्वेन्स चित्रीत करणे खूप कठीण होते. कारण त्यासाठी एकमेकांच्या खूप जवळ येणे गरजेचे होते. असे दृश्य याआधी मी कधीच केले नव्हते. त्यामुळे या दृश्याचे चित्रीकरण करताना मी खूप नव्हर्स झाले होते. पण मी माझ्या मालिकेच्या टीममुळे हे दृश्य देऊ शकले. प्रेक्षकांना या मालिकेचे पुढील भाग देखील तितकेच आवडतील अशी मला खात्री आहे. 

Also Read : पिया अलबेलामधील अक्षय म्हात्रेने शीन दासला शिकवली बंदूक चालवायला
Web Title: Parni Narayan in Pia Albale and turn of puja
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.