कर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 04:05 PM2018-11-14T16:05:36+5:302018-11-14T16:27:17+5:30

पूर्वीच्या ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे पंकजला असंख्य प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले होते. आता आशीम गुलाटीच्या रूपात नव्या पिढीतील प्रेक्षकांना एका नव्या कर्णाचे दर्शन घडणार आहे.

Pankaj dheer to train aashim gulati for karan's role | कर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण

कर्णाच्या भूमिकेसाठी पंकज धीर देणार या अभिनेत्याला प्रशिक्षण

googlenewsNext

टीव्हीवरील ‘महाभारत’ या मालिकेत कर्णाच्या भूमिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेला ज्येष्ठ अभिनेता पंकज धीर आता नव्या काळातील कर्णाला- ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ या आगामी मालिकेतील आशीम गुलाटीला प्रशिक्षण देण्यास अधीर झाला आहे.

पूर्वीच्या ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे पंकजला असंख्य प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले होते. आता आशीम गुलाटीच्या रूपात नव्या पिढीतील प्रेक्षकांना एका नव्या कर्णाचे दर्शन घडणार आहे. कर्णाची व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी त्याच्या व्यक्तिरेखेतील बारकावे आणि त्याची देहबोली अचूकपणे व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला पंकज  धीरची भेट घ्यायचीच आहे, असा आग्रह आशीमने धरला होता, असे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांच्या सांगण्यानुसार निर्माते पंकजला या मालिकेच्या सेटवर आणणार आहेत, म्हणजे तो आपल्या सर्जनशील सूचना आशीमला देऊ शकेल. पंकजला पुन्हा एकदा पडद्यावर पाहणे कसे वाटेल?  महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत. कर्णसंगिनी' ही कविता काणे यांची कादंबरी 'कर्णाज्‌ वाईफः दि आऊटकास्ट क्वीन'वर आधारित आहे. या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Pankaj dheer to train aashim gulati for karan's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.