Or you will see Priyal Gore in this series due to your coming | ​आप के आ जाने से या मालिकेत प्रियल गोर दिसणार या भूमिकेत

झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आप के आ जाने से ही आपल्या नाट्‌यमय वळणांसह प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेत आता एक नवी एंट्री होणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतेच पाहिले की, वेदिका (सुहासी धामी) आणि साहिल (करण जोटवानी) यांना श्रुती (क्षितीजा सक्सेना) चा भावी पती प्रेरितचे वागणे विक्षिप्त वाटते आणि ते त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतात. त्यांना असेही वाटते की प्रेरित आणि पुनिष (करण मेहता) हे त्यांच्या विरोध कारस्थाने करत आहेत आणि त्यामुळे त्यांना उघडकीस पाडण्याचे हे ठरवतात. या सगळ्‌या नाट्‌यामध्ये वेदिकाला अपघात होतो आणि तिला मृत समजले जाते. त्याच वेळेस एक दुसरी स्त्री अगरवाल घरात प्रवेश करते आणि स्वतः वेदिका असल्याचे सगळ्यांना सांगते. ही भूमिका मालिकेत पियल गोर साकारणार आहे.
नवीन वेदिका सांगते की, अपघातानंतर ती भरपूर भाजली होती आणि त्यासाठी तिला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्या कॉस्मेटिक सर्जरींमुळे आता ती वेगळी दिसत आहे. ती वेदिकासारखीच बोलते आणि वागते आणि परिवारातील सर्व सदस्यांबद्दल तिला सर्वकाही ठाऊक आहे. ती आपली ओळख पटवून देते आणि तिच्या दिशेने येणाऱ्या शंकांकडे दुर्लक्ष करते. अखेर अख्खा परिवार तिचे म्हणणे मानतो, केवळ साहिलला तीच वेदिका आहे हे पटत नाही. याविषयी प्रियल सांगते, “मी लवकरच आप के आ जाने से मध्ये प्रवेश करणार असून ही भूमिका प्रेक्षकांना थक्क करेल. हा नवीन ट्रॅक साहिल आणि वेदिकाच्या आयुष्यात उलथापालथ करेल. आप के आ जाने से सारख्या विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शोचा हिस्सा बनताना मी खूप आनंदित आहे. वयाने मोठी असलेली स्त्री तिच्यापेक्षा तरुण पुरूषाच्या प्रेमात का पडू शकत नाही हा सवाल हा शो उपस्थित करतो.”

Also Read : आप के आ जाने से या मालिकेद्वारे सुहासी धामी करणार कमबॅक
Web Title: Or you will see Priyal Gore in this series due to your coming
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.