Only 36 hours of contract | केवळ ३६ तासांचा कॉन्ट्रक्ट

‘बिग बॉस’च्या घरात मी किती दिवस राहणार, काय गेम खेळणार, कोणाशी वाद घालणार किंवा कोणाला जवळ करणार याविषयीचा कुठलाही प्लॅन मी केलेला नाही. केवळ ३६ तासांचा कॉन्ट्रक्ट करून मी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगणे मुश्किल आहे, अशा शब्दात ‘बिग बॉस’च्या घरातील कंटेस्टेंट अभिनेता राहुल देव याने सांगितले. ‘बिग बॉस सीजन-१०’च्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

प्रश्न : ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यासाठी बरेचसे सेलिब्रिटी उत्साहित असतात, तुझा अनुभव काय सांगशील?
- दोन दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात जावे लागणार असल्याचे समजले. त्यामुळे विचार करायला पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यामुळे मी आता केवळ घरात प्रवेश करण्याचा विचार करीत आहे. पुढे काय होईल हे आताच सांगणे मुश्किल आहे. खरं तर मी घरात राहण्यासाठी केवळ ३६ तासांचा कॉन्ट्रक्ट केलेला आहे. जर पुढच्या सर्व गोष्टी सहज जुळून आल्यास मी गेम खेळण्याचा विचार करणार. अर्थात हे घरातील वातावरणावर अवलंबून असेल. 

प्रश्न : ‘बिग बॉस’च्या घरात काही काळानंतर बºयाचशा उलथापालथ होत असतात, त्यामुळे बहुतेक सेलिब्रिटी प्लॅन करून घरात प्रवेश करतात, तू काही प्लॅन केले का?
- नाही. मला असं वाटते की, जोपर्यंत घरातील इतर सदस्यांचे स्वभाव कळत नाहीत, तोपर्यंत प्लॅन करण्यात काही अर्थ नाही. मुळात घरात गेम हा संपूर्णपणे इतर सदस्यांच्या स्वभावावर अवलंबून असतो. त्यामुळे आपण काहीही प्लॅन केला तरी, तो तिथे लागू होईलच असे मला वाटत नाही. फक्त मानसिक परिपक्व असणे गरजेचे असते. कारण बिग बॉसच्या घरात मानसिकतेची कसोटी लागत असल्याने, तुम्हाला येणाºया प्रत्येक अडीचणींचा सामना नेटाने करावा लागतो. अन् त्यासाठी मी नेहमीच तयार असतो. 

प्रश्न : मोबाइल, सोशल मीडियापासून दूर राहणे तुला शक्य होईल का?
- मी अजिबात मोबाइल अ‍ॅडिक्ट नाही. त्यामुळे मला मोबाइल अन् सोशल मीडियापासून दूर राहणे शक्य आहे. मला असे वाटते की, जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात जाण्याचा विचार करता, तेव्हाच तुम्हाला यासर्व गॅझेट्सपासून दूर रहावे लागेल, याची मानसिकता तयार करावी लागते. मी हा सर्व विचार करूनच बिग बॉसच्या घरात जाण्याचा विचार केला आहे. 

प्रश्न : तू बºयाचशा चित्रपटात डॅशिंग खलनायकाची भूमिका साकारली आहे, हा खलनायक आम्हाला बिग बॉसच्या घरातही बघायला मिळेल का?
- हा येणारा काळच ठरवेल. पण मला असे वाटते की पडद्यावर खलनायक साकारणे अन् बिग बॉसच्या घरात वावरणे यात खूप फरक आहे. मी फक्त ‘लाइफ चेंज’ अनुभव घेऊ इच्छितो. घरात मी किती दिवस राहणार हे मला माहीत नाही. पण मी माझ्या फॅन्सचे नक्कीच मनोरंजन करणार. त्यांनीदेखील मला वेळोवेळी तारावे हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा असेल. कारण या घरात अधिककाळ टिकायचे असेल तर फॅन्सचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. 
Web Title: Only 36 hours of contract
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.