छोट्या पडद्यावरील कलाकार एकत्र काम करतात आणि काम करता करता त्यांच्यात प्रेमाचे बंध निर्माण होतात.हे कपल्स एकमेकांच्या प्रेमात धुंद होऊन जातात. मात्र लव्हस्टोरी ऐन बहरात असताना त्यांच्या प्रेमाच्या नात्यात मिठाचा खडा पडतो आणि ब्रेकअप होतं. अशा कलाकारांच्या अनेक जोड्या आहेत.कधी काळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे कपल्स आजघडीला एकमेकांशी बोलत नाहीत. बोलणं तर दूरच हे कपल्स एकमेकांच्या समोर येणंही टाळतात.पाहूया कोण आहेत हे कपल्स.
 
 
काम्या पंजाबी आणि करण पटेल
 


 
छोट्या पडद्यावरील काम्या पंजाबी आणि करण पटेल हे कलाकार एकेकाळी एकमेंकावर जीवापाड प्रेम करत होते.त्यांच्या प्रेमाच्या चर्चा इंडस्ट्रीत खुमासदारपणे सुरु होत्या. तर हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी आशा त्यांच्या फॅन्सना वाटत होती. मात्र अचानक काम्या आणि करणचं ब्रेकअप झालं.यानंतर करणनं अंकित भार्गवशी लग्न केलं.करणचे कुटुंबीय काम्यासह लग्नासाठी तयार नव्हते असं त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं जातं. मात्र करणनं अंकिताशी लग्न केल्यानंतर काम्या आणि करण या दोघांमधील संबंध आणखी बिघडले. आता तर दोघंही एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत.
 
 
 
दिलजीत कौर आणि शालीन भानोत
 

 
'कुलवधू' मालिकेच्या सेटवर दिलजीत आणि शालीन भानोत यांची ओळख झाली.या ओळखीचं रुपांतर आणि मैत्रीत त्यानंतर प्रेमात झालं. 2009 साली हे कपल विवाहबंधनात अडकलं. मात्र दोघांचं हे नातं फार काळ काही टिकलं नाही. दिलजीतनं शालीनवर कौटुंबिक कलहाचा आरोप करत काडीमोड घेतला. यानंतर दोघंही एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत.
 
 
 
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी


 

 
'कसौटी जिंदगी की' या छोट्या पडद्यावरील मालिकेनं श्वेता तिवारी हिला नवी ओळख मिळवून दिली. यातील प्रेरणा ही भूमिका श्वेतानं अशी काही साकारली की ती घराघरात लोकप्रिय ठरली. श्वेतानं 1998 साली राजा चौधरीसह लग्न केलं होतं. दोघांच्या आयुष्यात पलक नावाची गोंडस मुलगीही आली. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं असं सांगितलं जातं. मात्र 2007 मध्ये असं काही घडलं की श्वेतानं राजा तिवारीवर कौटुंबिक कलहाचा आरोप करत घटस्फोट घेतला. यानंतर राजा आणि श्वेता एकमेकांसमोर येणं टाळतात. काही वर्षांपूर्वी श्वेतानं अभिनव कोहलीसह लग्न करत नव्याने संसार थाटला. या दोघांच्या आयुष्यात रेयांश नावाच्या बाळाचीही एंट्री झालीय.
 
 
 
पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा

 
 
'क्योंकी साँस भी कभी बहू थी' आणि 'कहो ना यार है' अशा मालिकांमध्ये अभिनेता पुलकित सम्राटनं काम केलं आहे. 2014 साली पुलकितनं बॉलिवूडचा दबंग खान सलमानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा लव्ह मॅरेज केलं. मात्र दोघांचं लग्न वर्षभरही टिकाव धरु शकलं नाही. पुलकित आणि यामी गौतम यांची जवळीक या नात्यातील ब्रेकअपला कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. पुलकित आणि श्वेता आता एकमेकांपासून बरेच दूर गेले असून दोघंही एकमेकांचं तोंड बघत नाहीत.
 
 
 
रश्मी देसाई आणि नंदीश साधू

 


'उतरन' फेम रश्मी देसाई फेब्रुवारी 2011मध्ये अभिनेता नंदीश साधूसह रेशीमगाठीत अडकली. मात्र दोन वर्षातच रश्मी आणि नंदीशच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. या नात्याबाबत रश्मीनं एका मुलाखतीमधून व्यक्त होण्याचा प्रयत्नही केला होता. लग्न ही दोन व्यक्तींची जबाबदारी असते. मात्र आम्हां दोघांच्या नात्यात एकमेकांविषयी द्वेष, मत्सर आणि शिव्या शापच होते. लग्नानंतर तीन वर्ष आम्ही सोबत राहिलो नाही. शिवाय दोघांमध्ये अशा ब-याच गोष्टी घडल्या आहेत की त्या जाहीरपणे सांगणं योग्य नाही असं रश्मीनं या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. मात्र दोघांच्या नात्यातील दुराव्याला नंदीशचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळेच दोघांचं नात तुटल्याचं सांगितलं जातंय. मात्र याबाबत दोघांनीही अधिकृतरित्या याबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. अखेरीस 2016 साली रश्मी आणि नंदीश एकमेकांपासून काडीमोड घेत दूर झाले. आता एकमेकांसोबत काम करणं तर दूरच ते एकमेकांकडे पाहतही नाहीत.
 
देलनाज इराणी आणि राजीव पॉल
 

 
देलनाज इराणी आणि राजीव पॉल यांच्याकडे इंडस्ट्रीतील एक क्यूट कपल म्हणून पाहिलं जात असे. देलनाज आणि राजीव एकत्र 'नच बलिये' या डान्स रियालिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये झळकले होते. आपला डान्स आणि केमिस्ट्रीनं दोघांनीही सा-यांची मनं जिंकली होती. मात्र अखेरीस या दोघांच्या नात्यालाही बहुदा कुणाची तरी नजर लागली आणि 14 वर्षांचं दोघांचं प्रेमाचं नातं तुटलं. देलनाज आणि राजीव घटस्फोट घेऊन एकमेकांपासून दूर झाले. दोघांच्या या ब्रेकअपला राजीवचे विवाहबाह्य संबंध जबाबदार असल्याचा आरोप झाला. मात्र राजीवनं याचा इन्कार केला.
 
 
राहुल महाजन आणि डिम्पी गांगुली


 
'बिग बॉस' या रियालिटी शोमधील आपल्या कारनाम्यांमुळे राहुल महाजन यानं छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर छोट्या पडद्यावरील विविध शोमध्ये राहुल महाजन झळकला. याचवेळी 'राहुल दुल्हनियाँ ले जायेगा' नावाचा रियालिटी शो छोट्या पडद्यावर आला. या रियालिटी शोमध्ये राहुल महाजनने डिम्पी गांगुलीशी दुसरं लग्न केलं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये वादाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. लग्नाच्या काही महिन्यातच डिम्पीनं राहुलवर मारहाणीचा आरोप केला.या संदर्भात राहुलनं माफी मागितल्यानंतर डिम्पी त्याच्याकडे पुन्हा परतली. मात्र 2014 साली डिम्पीनं राहुलवर छळाचा आरोप केला आणि त्याचं घर कायमचं सोडलं. यानंतर दोघांनीही काडीमोड घेतला. घटस्फोटानंतर डिम्पीनं बिजनेसमॅन रोहित रॉयसह लग्न केलं. डिम्पी आणि रोहितच्या जीवनात एका गोंडस परीचीही एंट्री झालीय. 
 
Web Title: One-time lovebirds and couples do not even bark together each other
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.