OMG! Fem Raam Kapoor Gets Too Bad | OMG! ​बडे अच्छे लगते है फेम राम कपूरवर दाखल झाला गुन्हा

बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे नावारूपाला आलेल्या राम कपूरवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम नेहमीच सगळ्या वादांपासून दूर राहाणारा अभिनेता आहे. पण मुंबई मिरर या वर्तमानपत्राच्या नुसार त्याने कुलाबामधील मावी बिझनेस व्हेंचर एलएलपी या कंपनीकडून ३५ लाख रुपये घेतले होते. पण त्याने ते पैसे परत केले नाहीत. मावी बिझनेस व्हेंचर एलएलपी ही कंपनी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करत असून रामने त्यांना फसवले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २१ जून २०१७ ला कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आहे. 
अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डचे पैसे देण्यासाठी राम कपूरकडे पैसे नसल्याने मावी बिझनेस व्हेंचर एलएलपीने रामला कर्ज दिले होते. पण राम हे कर्ज परत करू शकला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आता रामच्या विरोधात कोर्टात केस देखील उभी राहिली आहे.
मे २०१७ ला रामला लीगल इंडिया लाॅ सर्विस या कंपनीने पैसे परत करण्यासाठी लीगल नोटिस पाठवली होती. त्याने पैसे परत न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यात म्हणण्यात आले होते. त्या नोटिसमध्ये रामने कर्ज घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत मावी बिझनेस व्हेंचर एलएलपीला २४ टक्के व्याजावर पैसे परत करावेत असे म्हटले होते. रामने हे कर्ज ऑगस्ट २०१६ मध्ये घेतले होते. याबाबत इंडिया फोरम या वेबसाईटने रामला संपर्क साधला असता त्याने सांगितले, हे मॅटर मी संबंधित अधिकाऱ्यांना सोपावले आहे. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. 
राम कपूरने हिना या मालिकेपासून त्याच्या करियरला सुरुवात केली आहे. कविता या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. घर एक मंदिर, बडे अच्छे लगते है, कसम से यांसारख्या मालिकांमुळे तो नावारूपाला आला. झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये देखील तो झळकला होता. उडान, स्टुडंट ऑफ द इयर, हमशक्ल यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे खूप कौतुक झाले होते. 

Also Read : राम कपूरची लव्हस्टोरी; वाचा दीर-भावजयीची जोडी कशी अडकली विवाहबंधनात?
Web Title: OMG! Fem Raam Kapoor Gets Too Bad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.