Om Shanti Omchi copy of life has been done in the house | ​जिंदगी की महेकमध्ये केली गेली ओम शांती ओमची कॉपी

नाट्यपूर्ण कथानक आणि त्याला मिळत असलेली अनपेक्षित कलाटणी यामुळे झी टीव्हीवरील जिंदगी की महेक या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या ओम शांती ओम चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच दृश्य पाहायला मिळणार आहे.
जिंदगी की महेक या मालिकेत महेकची म्हणजेच समीक्षा जैस्वालची स्मृती परत येणार आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांबाबत शौर्यला म्हणजेच करण व्होराला जाब विचारायचे असे ती ठरवणार आहे. पण तिने तसे केले, तर नीवच्या म्हणजेच आरिफ शर्माच्या जीवाचे मी बरेवाईट करेन अशी धमकी मंधार म्हणजेच सनी सचदेव तिला देणार आहे. खरे तर त्यानेच महेकचा काटा काढण्याचा कट रचला होता. महेक पाण्यात बुडली पाहिजे यासाठी त्याने सगळे प्रयत्न केले होते. पण त्यातून ती कशीबशी वाचली. आता तर तिची स्मृती परत आली असून आपण वंदना नाही हे तिला कळणार आहे. महेक संकटात सापडली आहे, हे शौर्यला कळल्यावर आता तो आर्चीसोबतचे म्हणजेच ओर्वाना घईसोबतचे आपले लग्न अर्धवट टाकून तिच्या मदतीसाठी धावणार आहे आणि मंधार आणि आर्ची यांचे कुटिल कारस्थान संपूर्ण कुटुंबियांसमोर उघड करण्याची शौर्य आणि महेक योजना आखणार आहेत. ‘ओम शांती ओम’ चित्रपटात शेवटच्या प्रसंगात ज्याप्रमाणे दीपिका पादुकोणचे भूत तिचा वेश घेऊन येते, त्याप्रमाणे महेकही आर्चीकडून तिच्या गुन्ह्यांची कबुली करून घेण्यासाठी भुतासारखी फिरणार आहे आणि आर्चीला घाबरवणार आहे. या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासाठी समीक्षा जैस्वाल खूपच उत्सुक होती. ती सांगते, “महेकची भूमिका वठविताना मी आतापर्यंत अनेक वेगवेगळी रूपं धारण केली आहेत. या मालिकेसाठी भुताचे रूप धारण करण्याचा अनुभव खूपच मजेशीर होता. योगायोग असा की मी नुकताच ओम शांती ओम पाहिलेला असल्याने हा प्रसंग साकारताना मला सतत त्या चित्रपटातील शेवटच्या प्रसंगाची आठवण येत होती. प्रेक्षकांना देखील जिंदगी की महेक मधील हे दृश्य पाहाताना नक्कीच ओम शांती ओमची आठवण येईल. 

Also Read : हा अभिनेता बनला फिटनेस गुरू
Web Title: Om Shanti Omchi copy of life has been done in the house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.