अरे बापरे..! 'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा लवकरच येणार सगळ्यांसमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:03 PM2019-02-06T16:03:02+5:302019-02-06T16:03:35+5:30

'तुला पाहते रे' या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार असून प्रेक्षकांना धक्का बसणार आहे.

Oh my god! /new twist in tula pahate re serial | अरे बापरे..! 'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा लवकरच येणार सगळ्यांसमोर

अरे बापरे..! 'तुला पाहते रे'मध्ये विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा लवकरच येणार सगळ्यांसमोर

googlenewsNext
ठळक मुद्दे 'तुला पाहते रे' या मालिकेत येणार नवीन ट्विस्ट


झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विक्रांत सरंजामे आणि ईशाची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली आणि अल्पावधीतच 'तुला पाहते रे' ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली. मात्र आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार असून प्रेक्षकांना धक्का बसणार आहे. 

सामान्य घरातील ईशा निमकर सरंजामे कुटुंबात लग्न करून आली आणि ती या घरात हळूहळू रुळते आहे. सगळे सुरळीत चालू असताना आता मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. मालिकेतील जालिंदरची व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने ईशाला वेळोवेळी सावध करताना प्रेक्षकांनी पाहिले आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यामुळे जालिंदरच्या म्हणण्यात तथ्य आहे की काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणार आहे.

या प्रोमोमध्ये विक्रांतचा एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. विक्रांतने त्याच्या स्वार्थासाठी ईशाशी लग्न केल्याचे समोर येते. पण विक्रांतने असे का केलं? त्याच्या अशा वागण्याचे कारण काय आहे? या सगळ्यामागे त्याचा स्वार्थ काय आहे? या सर्व प्रश्नांचा उलगडा मालिकेच्या येत्या काही भागात होईल आणि हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे.

Web Title: Oh my god! /new twist in tula pahate re serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.