Now Salman Khan picked up his career to make Shilpa Shinde's career; Dabang Khan gave to sister-in-law, 'This'! | आता शिल्पा शिंदेचे करिअर घडविण्याचा सलमान खानने उचलला विडा; दबंग खानने भाभीजीला दिली ‘ही’ आॅफर!

बॉलिवूडचा दबंग सलमान खान ज्याच्यावर मेहरबान होतो, त्याचे आयुष्यच बदलून जाते हे आता नव्याने सांगण्याची काही गरज नाही. सलमानने आतापर्यंत इंडस्ट्रीत अनेकांना लॉन्च केले. अनेकांचे करिअर घडविले. आता बिग बॉस ११ ची विनर असलेल्या शिल्पा शिंदेचे करिअर घडविण्याचा दबंग खानने विडा उचलला आहे. खरं तर संपूर्ण सीजनदरम्यानच सलमान शिल्पाच्या फेव्हरमध्ये असल्याचे दिसून आले. बºयाचदा सलमानला शिल्पाचे कौतुक करतानाही बघण्यात आले. अनेकदा तर त्याने शिल्पावरून इतर सदस्यांना फटकारलेही. दस्तुरखुद्द सलमानची आई सलमा खान यांचीदेखील शिल्पा फेव्हरेट होती. अशात सलमान तिचे करिअर घडविणार नसेल तर नवलच म्हणावे लागले. 

टाइम्स आॅफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, सलमान खानने त्याची फेव्हरेट शिल्पासाठी असे काही केले, ज्यावरून हे स्पष्ट होते की, सलमान पुन्हा एकदा शिल्पाचे करिअर ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असे म्हटले जात आहे की, सलमानने शिल्पा शिंदेविरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर प्रकरणांमध्ये मदत करणार असल्याचे म्हटले आहे. शिल्पाने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. तिने म्हटले की, ‘माझे बहुतांश कायदेशीर प्रकरणे निकाली लागले आहेत. बिग बॉस शोनंतर सलमानने मला विचारले होते की, ‘तुझी काही कायदेशीर प्रकरणे पेंडिंग आहेत काय? असतील तर त्यात मी तुला मदत करणार आहे.’

शिल्पाने पुढे बोलताना म्हटले की, जेव्हा मी काही जुन्या प्रकरणांमुळे त्रस्त होते तेव्हा अनेकांनी मला सलमानकडे मदत मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी माझे सलमानशी फारसे संबंध नव्हते. परंतु आज मला खरोखरच आनंद होत आहे की, एवढ्या मोठ्या सुपरस्टारने स्वत:हून मला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.’ रिपोर्टनुसार शिल्पाने दबंग खानचे कौतुक करताना म्हटले की, बिग बॉसमध्ये सलमान खान एकमेव अशी व्यक्ती होती, जिने मला अखेरपर्यंत साथ दिली. 
Web Title: Now Salman Khan picked up his career to make Shilpa Shinde's career; Dabang Khan gave to sister-in-law, 'This'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.