Now the famous singer will make entry into the Big Boss Marathi house | आता हा प्रसिद्ध गायक करणार बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रेक्षकांना तसेच घरामधील सदस्यांना एका नंतर एक सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकरने काल बिग बॉस मराठीचे घर सोडले. ती घरामध्ये फक्त सात दिवसांची पाहुणी होती असे बिग बॉसने सदस्यांना सांगितले. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसला. तसेच काल घरामध्ये “SR” म्हणजे कोण? याचे कोडे उलघडले. बिग बॉसने शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. तेव्हा या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय बदलणार? कोण कोणाच्या बाजूने उभे रहाणार? या गोष्टीची उत्सुकता असतानाच आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे त्यागराज खाडिलकर. 
त्यागराज खाडिलकरने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात स्मरणयात्रा नावाच्या मराठी चित्रपट संगीताचा इतिहास सांगणाऱ्या कार्यक्रमाद्वारे केली. त्यागराजला अखिल भारतीय मराठी विद्यार्थी परिषदेचा गानहिरा हा पुरस्कार मिळाला असून तो संस्कृती कलादर्पण, महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराचा देखील मानकरी ठरला आहे. त्यागराजने ५२ हून अधिक मालिकांचे शीर्षक गीत गायले असून अनेक सिनेमांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तसेच अनेक चित्रपटांमध्ये गीते गायली आहेत. “बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मला जायची संधी मिळत आहे हे माझं भाग्याचं आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. कारण या घरामध्ये जाण्याचे आमंत्रण किंवा संधी सगळ्यांनाच मिळत नाही. मी आजवर चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळेच मला या घरामध्ये जाण्याची संधी मिळत आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यास मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे. या घरामध्ये जायच्या अगोदर मी दोन गोष्टी निश्चित केल्या आहेत, त्यातील पहिली म्हणजे बिग बॉसने दिलेले सगळे टास्क मनापासून करायचे आणि घरामधील काही सदस्य मनाने, वर्तणुकीने चांगले आहेत. परंतु स्वभावाने दुबळे आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहायचे. कोणत्याही परिस्थितीत जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे त्याच्या विरोधात उभे राहायचे. पुष्कर जोग, मेघा धाडे आणि आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी हे माझे या घरातील आवडते सदस्य आहेत.

tyagraj khadilkar

Also Read : ​रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्या नात्याबाबत अखेर त्याच्या पत्नीने सोडले मौन...
Web Title: Now the famous singer will make entry into the Big Boss Marathi house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.