Nisha Sharma web series trailer launches, but Nervus is not an event, but because of this 'thing', she has got a lot of trouble ... | निया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...

एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात.या प्रसंगी आपण ग्लॅमरस कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात.त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे टीव्ही अभिनेत्री निया शर्मासोबत.नुकतंच निया शर्माच्या 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्च झाला आहे.यावेळी तिने स्लिट गाउन आणि हॉट पँट परिधान केले होते. पण हाच डिझायनर ड्रेस नियासाठी मात्र डोकेदुखी ठरला. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे निया भलतीच नर्व्हस झाली. तिचा नर्व्हसनेस पाहून ती या वेब सीरिजमुळे नर्व्हस असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र खुद्द नियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. अनेकदा ट्रायल घेऊनदेखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून गेली. त्यामुळे या वेब सीरिजमुळे नाही तर या ड्रेसमुळे नर्व्हस झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे. ही वेब सीरिज योग्य पद्धतीने प्रमोट होत असल्याचा आनंदही तिने व्यक्त केला आहे. ट्रेलर लॉच इव्हेंटसाठी नियाचा हा ड्रेस तिचा जवळचा मित्र शाहिद आमिरने डिझाइन केला होता. यापूर्वीही त्यांनी नियासाठी ड्रेस डिझाइन केलेले आहेत. त्याने डिझाईन केलेली ड्रेसिंग स्टाईल नियाला पसंत आहे. मात्र पहिल्यांदाच हा डिझायनर ड्रेस नियासाठी डोकेदुखी ठरला. त्यामुळे संपूर्ण इव्हेंटमध्ये निया नर्व्हस दिसली. दरम्यान, नियाचा एक व्हिडीओ समोर आला होता.त्यामध्ये तिचा विचित्र मेकअप चर्चेचा विषय ठरला होता.भडक मेकअपवर तिने लावलेल्या लिपस्टिकचा शेड खूपच विचित्र होता.या व्हिडीओमध्ये निया स्माइल करताना दिसत होती.विशेष म्हणजे, तिच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांना विनंती करावी लागली की,तिने अशा प्रकारच्या लिपस्टिकचा वापर करू नये. दरम्यान, नियाने हा मेकअप स्टंट तिच्या स्टायलिस्टकडून करून घेतला होता.Web Title: Nisha Sharma web series trailer launches, but Nervus is not an event, but because of this 'thing', she has got a lot of trouble ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.