Nirbhay Wadhwaa got hurt, but still the action done by Karma Fandakar Shani | निर्भय वाधवाला झाली दुखापती तरीही केले कर्म फलदाता शनीचे चित्रीकरण

निर्भय वाधवाने अनेक पौराणिक मालिकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने संकटमोचक महाबली हनुमान या मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता कलर्सच्या कर्म फलदाता शनी या मालिकेत देखील तो प्रेक्षकांना हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी निर्भय सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. निर्भय त्याच्या फिटनेसवर नेहमीच मेहनत घेतो. तो चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी न चुकता जिममध्ये जातो. जिममध्ये व्यायाम करताना नुकताच त्याला अपघात झाला आहे. वजन उचलताना त्याच्या उजव्या हाताला चांगलेच लागले आहे. कर्म फलदाता शनी या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याच्या काहीच दिवस आधी हा अपघात घडला.
निर्भयला चांगलीच दुखापत झाली असल्याने मालिकेचे चित्रीकरण पुढे ढकलावे लागेल असेच सगळ्यांना वाटत होते. पण त्याने चित्रीकरणाच्या वेळापत्रकात काहीही बदल केलेला नाही आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन तो चित्रीकरणाला रुजू झाला आहे. हनुमानाच्या भूमिकेसाठी त्याला अवकाशात लटकण्याचे अनेक सीन चित्रीत करण्याची आवश्यकता होती. पण दी दृश्यं देखील त्याने खूप चांगल्याप्रकारे दिली. याविषयी निर्भयशी संपर्क साधला असता त्याने सांगितले, “वजन उचलताना माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी फक्त दोनच दिवस आधी हा अपघात घडला होता. पण मला चित्रीकरण पुढे ढकलायचे नव्हते. शनी आणि हनुमान या दोन्ही देवांच्या संघर्षाचे मला खूप आकर्षण वाटते आणि मला माझे काम खूप आवडते. त्यामुळे मला चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बदल करायचा नव्हता आणि म्हणून मी कर्मफलदाता शनिच्या सेटवर हजर झालो.”
शनिचे जीवन अतिशय खडतर बनविण्यासाठी रावणाने आयोजित केलेल्या कटाचा एक भाग म्हणून हनुमान मालिकेत प्रवेश करताना दाखवण्यात येणार आहे. पण, जेव्हा हनुमान शनिशी लढाई करण्याची तयारी करत असतो, तेव्हा त्याच्यावर नजर ठेवताना त्याच्या आतील आवाजाने तो गोंधळात पडतो असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता हनुमानाला शनिची मैत्री आणि त्याच्या आठवणी आठवतात का की तो शनिशी युद्ध करतो हे पुढील भागांमध्ये दाखवण्यात येणार आहे. 

Also Read : निर्भय वाधवा कलर्सच्या कर्मफलदाता शनिमध्ये हनुमान म्हणून प्रवेश करणार!
Web Title: Nirbhay Wadhwaa got hurt, but still the action done by Karma Fandakar Shani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.