Nine stars in the first part of the crossover | ​करोडपतीच्या पहिल्याच भागात नऊ तारका

कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाच्या सेटवर पहिल्याच भागात प्रेक्षकांना नऊ तारका पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशी करणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात स्वप्निलचे स्वागत करण्यासाठी त्याच्या नायिका खास हजेरी लावणार आहेत. नवरात्री असल्यामुळे या नऊ तारकांसह नऊ स्पर्धक खेळणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीदेखील या पहिल्या भागात झळकणार आहेत. त्याच स्वप्निलचे कार्यक्रमात स्वागत करणार आहेत. सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, मनवा नाईक, प्रार्थना बेहरे, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, गौरी नलावडे, गिरिजा ओक यांसारख्या मराठीतील आजच्याघडीच्या प्रसिद्ध नायिका कोण होईल मराठी करोडपतीच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यातील काही हॉट सीटवरही बसणार आहेत. आपल्या या लाडक्या मित्राविषयी सई सांगते, "आजपर्यंत स्वप्निल हा आमचा मित्र होता. पण या कार्य़क्रमामुळे तो संपूर्ण महाराष्ट्राचा मित्र होईल अशी मला खात्री आहे."
Web Title: Nine stars in the first part of the crossover
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.