Nikki Anneja's brother is a famous Bollywood actor and encouraged her to go to Bollywood | ​निकी अनेजाचा भाऊ बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्यानेच तिला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन दिले

निकी अनेजाने नव्वदीच्या दशकात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. बात बन जाये, दास्तान, अंदाज, सी हॉक्स यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिची अस्तित्व... एक प्रेम कहानी ही मालिका तर प्रचंड गाजली होती. या मालिकेनंतर ती गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदी मालिकांमध्ये काम करत नाहीये. तिने दरम्यानच्या काळात काही इंग्रजी मालिकांमध्ये काम केले होते. निकीने २००२ मध्ये सोनी वालियासोबत लग्न केले असून ती गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहात आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ती तिच्या संसारात आणि मुलांमध्ये रमली असल्याने खूपच कमी काम करते. पण निकी अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर परतली आहे. ती सध्या स्टार प्लस वाहिनीवरील इश्क गुनाह या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची भूमिका काहीशी नकारात्मक असून या व्यक्तिरेखेला अनेक शेड्स आहेत. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

parmeet sethi

निकी अनेजा ही दहा वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जात असे. निकीचे लूक्स हे काहीसे अभिनेत्री माधुरी दीक्षित सारखे असल्याचे म्हटले जात असे. निकी आज अभिनेत्री असली तरी तिला कधीच अभिनेत्री बनायची इच्छा नव्हती. तिच्या एका भावाने तिला या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिल्याने तिने अभिनय करण्याचे ठरवले. तिचा हा भाऊ बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. निकी अनेजा ही परमीत सेठीची कझिन असून त्यानेच तिला अभिनयक्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिले होते. खरे तर निकीला पायलट बनायचे होते. पायलटचे शिक्षण घेण्यासाठी तिला बाहेरगावी जायचे होते. पण त्यासाठी पैसे देण्यास तिच्या वडिलांनी नकार दिला. त्यामुळे तिचे पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्या काळात अनेकवेळा परमीतने तिला तू दिसायला छान असल्याने तू अभिनयक्षेत्राचा विचार कर... असे सांगितले होते. त्याचे ऐकून निकी अभिनयक्षेत्राकडे वळले. या क्षेत्रात पैसा कमवून पायलटचे शिक्षण घ्यायचे असे तिने ठरवले होते. पण निकी नंतर याच क्षेत्रात रमली.

Also Read : निकी अनेजाला या गोष्टीमुळे बसला धक्का 
Web Title: Nikki Anneja's brother is a famous Bollywood actor and encouraged her to go to Bollywood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.