New Crime Show 'Special 5' on Star Pravah | स्टार प्रवाहवर नवा क्राईम शो 'स्पेशल ५'
स्टार प्रवाहवर नवा क्राईम शो 'स्पेशल ५'

ठळक मुद्दे 'स्पेशल ५' टीमची जिगरबाज गोष्ट 'स्पेशल ५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या घटना आपण दररोज ऐकत असतो, पाहत असतो. या घटना नकळतपणे आपल्याही मनात भीतीचे वातावरण निर्माण करतात. इतरांच्या बाबतीत घडणारे हे गुन्हे आपल्याही बाबतीत घडले तर? या विचाराने आपले मन अस्थिर व्हायला लागते. पण यापुढे असे होणार नाही. कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. कारण या गुन्हेगारी प्रवृत्तीचा खात्मा करण्यासाठी येतेय 'स्पेशल ५' ची टीम. आपल्या आजूबाजूला भीतीदायक वातावरण असताना 'स्पेशल ५'ची ही टीम तुमच्यासाठी आशेचा किरण नक्कीच ठरेल.


सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतला आहे. म्हणूनच तर पाच रांगड्या व्यक्तिमत्त्वांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. 'स्पेशल ५' या मालिकेत अजय पुरकर इन्सपेक्टर यशवंत इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत तर गौरी महाजन दिसेल सब इन्सपेक्टर विद्या शिंदेच्या भूमिकेत आणि सब इन्सपेक्टर अर्जुन भोसलेच्या भूमिकेत दिसेल अभिनेता समीर विजयन. या तीनही कलाकारांच्या प्रोमोजनी सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे या टीममधले उर्वरित दोघे कोण असतील याची उत्सुकता आहे आणि या मालिकेचे प्रोमो पाहून मालिकेच्या कथानकाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. तेव्हा 'स्पेशल ५' टीमची जिगरबाज गोष्ट अनुभवण्यासाठी १० डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर सज्ज व्हा. 
 


Web Title: New Crime Show 'Special 5' on Star Pravah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.