Neha Pendsea wants to have reality shows | ​नेहा पेंडसेला करायचे आहेत रिअॅलिटी शोज

नेहा पेंडसे सध्या मे आय कम इन मॅडम या मालिकेत एका बॉसची भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. नेहान अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिची भाग्यविधाता ही मराठी मालिका तर प्रचंड गाजली होती. तसेच ती अनेक हिंदी चित्रपटांमध्येदेखील झळकली आहे. सनी देओल आणि महिमा चौधरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या प्यार कोई खेल नही या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 
नेहाने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट-मालिका, हिंदी चित्रपट-मालिकांमध्ये, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपली ओळख मिळवल्यानंतर नेहाला काहीतरी वेगळे करायचे आहे. अनेक वर्षं मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता नेहाला रिअॅलिटी शोमध्ये तिचे भाग्य आजमावायचे आहे. रिअॅलिटी शो करण्याची इच्छा असल्याचे तिने नुकतेच बोलून दाखवले आहे. डान्स रिअॅलिटी शो अथवा एखादा अॅक्शन रिअॅलिटी शो करण्याचा गेल्या कित्येक दिवसांपासून माझा विचार आहे असे नेहा सांगते. नेहा ही खूप चांगली डान्सर असून तिने तिच्या नृत्याची कला अनेक चित्रपटांमध्ये दाखवली आहे. रिअॅलिटी शोसोबतच तिला एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील करायचे आहे. तिने तिच्या कारकिर्दीत कधीच सूत्रसंचालन केले नसल्याने तिला सूत्रसंचालन करून पाहायचे आहे.  
कोणत्याही कलाकाराला एकाच साच्यातील भूमिका करणे आवडत नाही. त्यामुळे नेहाला आता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत. मे आय कम इन मॅडम या मालिकेतील भूमिकेसाठी सध्या तिचे चांगलेच कौतुक होत आहे यासाठी ती खूपच खूश आहे. 
Web Title: Neha Pendsea wants to have reality shows
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.