ठळक मुद्देअंगद हा अतिशय चांगला आहे, तो कधीच कोणाचे वाईट करू शकत नाही. त्याला आधुनिक गॅजेटचे वेड असून तो त्याचा जास्तीत जास्त वेळ गॅजेट्स सोबतच घालवतो. त्याला तंदुरूस्त आणि निरोगी राहायला आवडते आणि त्यासाठी तो मेहनत देखील घेतो. तो नेहमीच कामाला प्राधान्य देतो.

कलर्स वाहिनीवरील कवच ही मालिका चांगलीच गाजली होती. आता या सुपरनॅचरल पॉवरवर आधारित मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीझनच्या सुरुवातीलाच महाशिवरात्रीच्या रात्री संध्या म्हणजेच दीपिका सिंग सुपरनॅचरल शक्तीला आवाहन देणार आहे. या रात्री घडलेल्या घटनांमुळे संध्याला एका काळ्या गुपिताविषयी कळणार असून योग्य वेळ येताच हे गुपित सगळ्यांना कळणार आहे.

संध्या, अंगद आणि कपिल या मुख्य पात्रांच्या भोवती कवच २ या मालिकेची कथा फिरणार असून ते आपल्या भुतकाळात घडलेल्या काही गोष्टींचा सूड घेणार आहेत. या तिघांचे नाते अतिशय गुंतागुंतीचे असून दीपिका सिंग या मालिकेत मुख्य भूमिकेत असल्याचे याआधीच घोषित करण्यात आले होते. आता नमिक पॉल या मालिकेचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. या मालिकेत तो अंगद ही भूमिका साकारत असून अंगद आणि संध्या यांच्यातील नाते अतिशय क्लिष्ट आहे.

अंगद हा अतिशय चांगला आहे, तो कधीच कोणाचे वाईट करू शकत नाही. त्याला आधुनिक गॅजेटचे वेड असून तो त्याचा जास्तीत जास्त वेळ गॅजेट्स सोबतच घालवतो. त्याला तंदुरूस्त आणि निरोगी राहायला आवडते आणि त्यासाठी तो मेहनत देखील घेतो. तो नेहमीच कामाला प्राधान्य देतो. या भूमिकेविषयी बोलताना नमिक पॉल सांगतो, “कवच या मालिकेचा याआधीचा सीझन अतिशय लोकप्रिय झाला होता आणि मला या दुसऱ्या सीझन मध्ये काम करायला मिळत आहे याचा मला प्रचंड आनंद झाला आहे. या भूमिकेसाठी माझा विचार करण्यासाठी मी कलर्स वाहिनीचे आणि बालाजी टेलिफिल्मचे आभार मानतो. या मालिकेच्या पहिल्या सीझनप्रमाणे या दुसऱ्या सीझनची कथा देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवेल याची मला खात्री आहे. या मालिकेतील भूमिकेसाठी मी सध्या मेहनत घेत असून ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.”

बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असलेली कवच 2 ही मालिका लवकरच कलर्स वाहिनीवर सुरू होणार आहे. 


Web Title: Namik Paul to play the lead role in COLORS’ Kawach 2
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.