Nagin fame has been found in love with Ada Khan, betrayal ... 'Jojabat ... from sage to salty till' | ​नागिन फेम अदा खानला प्रेमात मिळाला आहे विश्वासघात... ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ या कार्यक्रमात केला प्रियकराविषयी खुलासा

‘झी टीव्ही’वरील ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ कार्यक्रमात राजीव खंडेलवालशी गप्पा मारताना नुकताच नागिन फेम अदा खानने आपल्या आयुष्यातील कठीण कालखंड उलघडला. ‘झी टीव्ही’वरील सेलिब्रिटींच्या कष्टसाध्य, प्रेरणादायक आणि रंजक जीवन प्रवासावर हलक्याफुलक्या पद्धतीने प्रकाश टाकणारा ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ हा कार्यक्रम ५ मेपासून ‘झी टीव्ही’वर प्रसारित केला जात आहे. येत्या वीकेण्डमधील कार्यक्रमात अभिनेत्री अदा खान आणि करणबीर बोहरा यांच्याशी राजीव खंडेलवाल गप्पा मारताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. या गप्पांमधून या सेलिब्रिटींची काही गुपिते तर उघड होतीलच. पण त्यांच्या मनात खोलवर दडलेल्या खऱ्या भावभावनाही प्रेक्षकांना कळतील.
अदा खान आणि करणबीर बोहरा या कलाकारांना आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक नर्म विनोदी आणि अवघड प्रसंगांना सामोरे जावे लागले असून त्यांनी या कार्यक्रमात आपल्या जीवनातील काही कडू गोड प्रसंगांच्या आठवणी सांगितल्या. करणबीरने आपली रोमँटिक प्रेमकथा सांगितली आणि त्याची पत्नी तीजे ही आपल्या जीवनात आली, हे आपण आपले परमभाग्य मानतो, असे सांगितले. उलट अदा खानने सांगितले की, तिचा प्रेमावरील विश्वास अजिबात राहिलेला  आहे. त्याचे कारण विचारल्यावर अदा खान म्हणाली, “प्रेमाबद्दल म्हणाल, तर मला पूर्वी त्याचा भयानक अनुभव आला आहे. माझ्या प्रियकराने माझी फसवणूक केली आणि तरीही तीनदा मी त्याला माफ केले. पण शेवटी एका टप्प्यानंतर मला जाणवले की, प्रेमात फारसा अर्थ नाही. तेव्हापासून प्रेमाला माझ्या जीवनात प्राधान्य नाही.”
अदा खान आणि करणबीर बोहरा या दोन्ही कलाकारांच्या मनातील खोलवर दडलेल्या भावनांना त्यांनी या कार्यक्रमात वाट करून दिली. तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रात या दोघांनी मिळविलेल्या अपूर्व यशावर या दोघांनी गप्पा मारल्या. त्यानंतर राजीवने त्यांना प्रश्नांची उत्तरे झटपट (रॅपिड फायर) देण्यास सांगितले. नंतर त्यांनी ‘ट्विस्टर्स’ हा खेळ खेळून प्रेक्षकांची खूप करमणूक केली. अदा खान आणि करणबीर बोहरा या दोघांचेही फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असल्याने प्रेक्षकांना ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ या कार्यक्रमाचा हा भाग नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.

Also Read : 'नागिन'अॅक्ट्रेस अदा खानचे फोटोशूट,दिसला स्टनिंग लूक 
Web Title: Nagin fame has been found in love with Ada Khan, betrayal ... 'Jojabat ... from sage to salty till'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.