‘नागिन 2’मधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री 'या' अभिनेत्यासह अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 04:32 PM2018-10-19T16:32:36+5:302018-10-19T16:34:20+5:30

दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. नील- विंध्याच्या लग्नाची तारिख अद्याप ठरली नसून डिसेंबरमध्ये रोका पार पडणार असल्याचं समजतंय.

'Nagin 2' Actress Vindhya Tiwari and Neel Motwani to tie the knot | ‘नागिन 2’मधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री 'या' अभिनेत्यासह अडकणार लग्नबंधनात

‘नागिन 2’मधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री 'या' अभिनेत्यासह अडकणार लग्नबंधनात

googlenewsNext

लग्न घटिका समीप आली करा हो लगीनघाई म्हणत ‘ससुराल सिमर का’ आणि ‘नागिन २’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विंध्या तिवारी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेता नील मोटवानीसोबत विंध्या लग्नगाठ बांधणार असून सोशल मीडियावर नीलनेच ही आनंदाची बातमी दिली होती.

‘ये है मोहब्बतें’ आणि ‘वारिस’ यांसारख्या मालिकांमध्ये नीलने भूमिका साकारली आहे. ‘वारिस’ मालिकेच्या सेटवर या दोघांची भेट झाली.शूटिंगवेळी दोघांमध्ये जवळीक वाढु लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. नील- विंध्याच्या लग्नाची तारिख अद्याप ठरली नसून डिसेंबरमध्ये रोका पार पडणार असल्याचं समजतंय.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. विशेषतः नील आपल्या लेडी लव्ह विंध्याला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो. तिला सरप्राईजेस देणे हा जणू इशानचा छंदच बनला आहे. सकाळ संध्याकाळ नील विंध्यासाठी विविध गिफ्ट घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तर इशानने आपल्या प्रेमासाठी म्हणजेच विंध्यासाठी  खास  विशेष गिफ्ट मागवलं होतं. हे गिफ्ट पाहून विंध्याच्या आनंदाला पारावार उरला नाहीय. 

सध्या लग्नाच्या तयारीत बिझी असली तरीही विंध्या तिच्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत असल्याचे पाहायला मिळत आहे. विंध्या तशी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांची होणा-या नवरीच्यामनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता विंध्याची  झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: 'Nagin 2' Actress Vindhya Tiwari and Neel Motwani to tie the knot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.