My husband's wife, Fame Sachin Deshpande, tied the knot with her | ​माझ्या नवऱ्याची बायको फेम सचिन देशपांडेने हिच्यासोबत अडकला विवाहबंधनात

प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे, आरोह वेलणकर असे सिनेसृष्टीतील विविध कलाकार गेल्या वर्षी रेशीमगाठीत अडकले. गायिका सावनी रविंद्रने देखील नुकतेच डॉ. आशिष डांगेसोबत लग्न केले. आता या यादीत आणखी एक मराठमोळ्या कलाकाराचे नाव सामील झाले आहे. अभिनेता सचिन देशपांडेने काही दिवसांपूर्वी लग्न केले. सचिनच्या लग्नाची बातमी त्यानेच सोशल मीडियाच्या द्वारे त्याच्या फॅन्सना सांगितली आहे. मराठी लग्न म्हटले की, त्यात उखाणा हा आलाच... सचिनने देखील त्याच्या लग्नाची बातमी सांगताना एक छानसा उखाणा फेसबुकवर लिहिला आहे. त्याने लिहिले आहे की, 
आमच्या नात्याची गाठ 
देवानेच कुठेतरी बांधली असेल
पियूषाला सुखात ठेवण्यासाठी
मला जन्मायची संधी दिली असेल...
सचिनच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सनी खूप साऱ्या लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिनची ही पोस्ट हजाराहून अनेकांनी लाइक केली आहे. सचिनच्या पत्नीचे नाव पियुषा बिद्नुर असून तिचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी काहीही संबंध नाही. 
'माझ्या नव-याची बायको' मालिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंती उतरली. सध्या छोट्या पडद्यावर ही मालिका चांगलीच गाजते आहे. गुरुनाथ, राधिका आणि शनाया यांच्या आयुष्याच्या अवतीभवती फिरणारी ही मालिका रसिकांना चांगलीच भावते आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस ही मालिका रोमांचक आणि रंजक बनत चालली आहे. घराघरात प्रत्येकाला ही मालिका चांगलीच भावते आहे. नुकतंच या मालिकेला छोट्या पडद्यावर दाखल होऊन एक वर्ष पूर्ण झाले. सध्या छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. तुझ्यात जीव रंगला या मालिकेला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेकडून जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. कारण 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने टीआरपीमध्ये राणादा-अंजलीच्या मालिकेला मागे टाकले. माझ्या नवऱ्याची बायको टीआरीपमध्ये अव्वल स्थानी आहे. 

sachin deshpande with his wife

Also Read : ही प्रसिद्ध मराठी गायिका अडकली विवाहबंधनात
 
Web Title: My husband's wife, Fame Sachin Deshpande, tied the knot with her
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.