My friendship between Abhiur Sufi and Dhriti Mangeshkar in the series of my sai | ​मेरे साई या मालिकेतील अबीर सुफी आणि धृती मंगेशकर यांच्यात झाली मैत्री

मेरे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई बाबांच्या आयुष्यातील अनेक घटना पाहायला मिळत आहेत. साई बाबा आणि त्यांची लहानगी भक्त झिपरी यांच्यात काही तरी खास आणि आदरभावयुक्त असल्याचे आपल्याला माहीतच आहे. ती नेहमी त्यांच्या मागे मागे फिरते, त्यांच्याशी गप्पा मारते, सगळी कामे करताना त्यांचा सल्ला घेते आणि त्यांचा आदर करते. मेरे साई मालिकेत साईंची भूमिका अबीर सुफी तर झिपरीची भूमिका धृती मंगेशकर साकारत आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही या दोघांचे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. 
धृती आणि अबीर चित्रीकरणाच्या वेळी जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबतच घालवतात. ते एकमेकांसोबत खूप साऱ्या गप्पा मारतात. तसेच एकमेकांशी वेगवेगळ्या विषयांवर बोलतात. अबीर छोट्याशा धृतीसोबत अनेक वेळा सेटवर खेळताना देखील दिसतो. त्या दोघांची खूपच चांगली गट्टी जमली आहे. याविषयी अबीर सांगतो, “धृती सेटवर असली की वातावरण खूपच वेगळे असते. ती सेटवर प्रचंड धमाल करते. मालिकेत आमचे दोघांचे ज्याप्रकारे नाते आहे, त्याचप्रकारे नाते आमच्यात प्रत्यक्षात देखील आहे. तिच्यासोबत मी एखाद्या लहान मुलासारखा मजा-मस्ती करतो. ती सेटवर सगळ्यात जास्त माझेच ऐकते. मी जिकडे जातो, तिकडे ती माझ्या मागे मागे येते. तिच्या मित्र-मैत्रिणींबद्दल, तिच्या आवडत्या लोकांबद्दल मला सांगते. दृश्यांच्या दरम्यान मिळणाऱ्या वेळेत आम्ही खूप साऱ्या गप्पा मारतो. काही वेळा तर मी तिच्यासोबत खेळतो देखील. आम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत काम करायला खूप आवडते. आमचे खूप छान ट्युनिंग जमून आले आहे.
मेरे साईच्या आगामी भागांमध्ये, विष्णूला १५ दिवसांत खजिना शोधण्याची तंबी मिळणार आहे, अन्यथा त्याला गद्दार म्हटले जाणार अशी त्याला भीती आहे. विष्णुला असे वाटणार आहे की, या सगळ्याच्या मागे साई आहेत आणि कुलकर्णी त्याच्या संतापात आणखी तेल घालणार आहे. ज्यामुळे तो गावकर्‍यांना आणखी त्रास देणार आहे आणि शेवटी साईंना त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे लागणार आहे. दरम्यान, हा गुंता सोडवण्यात झिपरी मदत करणार आहे. 

Also Read : या कारणामुळे शर्मिला राजारामने स्वीकारली मेरे साई ही मालिका
Web Title: My friendship between Abhiur Sufi and Dhriti Mangeshkar in the series of my sai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.