मुकेश तिवारीला २० वर्षांपूर्वी झाली होती वेगळ्या शक्तीची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 01:45 PM2019-01-12T13:45:38+5:302019-01-12T13:47:53+5:30

सोनी सब वाहिनीवर 'बँड बाजा बंद दरवाजा' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता मुकेश तिवारी भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.

Mukesh Tiwari had a different power of 20 years ago | मुकेश तिवारीला २० वर्षांपूर्वी झाली होती वेगळ्या शक्तीची जाणीव

मुकेश तिवारीला २० वर्षांपूर्वी झाली होती वेगळ्या शक्तीची जाणीव

googlenewsNext
ठळक मुद्देमुकेश तिवारी दिसणार भूताच्या भूमिकेत'बँड बाजा बंद दरवाजा' ही हलकीफुलकी भीतीदायक विनोदी मालिका

सोनी सब वाहिनीवर 'बँड बाजा बंद दरवाजा' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता मुकेश तिवारी भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. तो पहिल्यांदाच भूताची भूमिका साकारीत असून या मालिकेबद्दल सांगताना म्हणाला की, माझा भूताशी कधी सामना झालेला नाही. पण साधारण वीस वर्षांपूर्वी मला वेगळ्या शक्तीची जाणीव झाली होती.

याबाबत मुकेश तिवारीने सांगितले की, 'साधारण २० वर्षांपूर्वी बनारसच्या घाटांवर एका आगळ्या वेगळ्या शक्तीची जाणीव मला झाली होती. आपल्याभोवती चांगल्या आणि वाईट शक्ती असतात यावर माझा ठाम विश्वास आहे.'

'बँड बाजा बंद दरवाजा' ही हलकीफुलकी भीतीदायक विनोदी मालिका असून यात संजीव शर्माची भूमिका मुकेश तिवारीने साकारली आहे आणि या मालिकेची कथा संजीव शर्माभोवती फिरते. तो २५ वर्षांनंतर त्‍याच्‍या पूर्ण होऊ न शकलेल्‍या प्रेमिकेच्‍या जीवनामध्‍ये भूत बनून परत येतो, यावर आधारीत मालिकेचे कथानक आहे.
या भूमिकेबाबत मुकेश तिवारीने सांगितले की,' माझ्याकरीता, भूत वास्तवदर्शी वाटून देणे हे महत्वाचे काम होते. या भुताला खोटे कृत्रिम दात किंवा शिंग असे काही नाही. बहुतांश वेळेला हे भूत माणसासारखेच दिसते. या भूमिकेसाठी मी काही संदर्भ भूमिका पहिल्या. खूप संशोधन करून आम्ही या भुताची गणना चांगल्या माणसात केली. हलक्या-फुलक्या विनोदी पद्धतीने ते नुसते घाबरवायचा प्रयत्न करते. '
या मालिकेची पटकथा मुकेश तिवारीला खूप भावल्याचे सांगितले व पुढे म्हणाला की,' आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही मर्यादित भागांची मालिका आहे. हे खूप महत्वाचे आहे आणि मर्यादित भागांत तुम्हांला एक निश्चित स्वातंत्र्य मिळते. आम्ही आधीच महिनाभराचं शुटिंग केलेलं आहे आणि त्यामुळे काम करताना काहीच ताण जाणवत नाही.'

Web Title: Mukesh Tiwari had a different power of 20 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.