Mountaineer Mount Velankar and Mugdha Chafekar will be seen in 'Gulmohar' | ​झी युवावरील ‘गुलमोहर’ मध्ये झळकणार आरोह वेलणकर आणि मुग्धा चाफेकर

झी युवाच्या गुलमोहर या मालिकेमध्ये नेहमीच वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. या वेळी गुलमोहर ही मालिका प्रेमाची भावना साजरी करण्यासाठी आगामी कथा 'चांदणी' द्वारे सज्ज झाली आहे. यावेळी आरोह वेलणकर आणि मुग्धा चाफेकर यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रीमंत कुटुंबातील एक साधा सरळ मुलगा रोहित आणि सेल्स गर्लचे काम करणारी कालिंदी यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे.
श्रीमंत आणि गरीब यांच्यातील प्रेमकथा ही नेहमीच रोमांचक असते. २००० कोटी मालमत्तेचा मालक असलेला रोहित सामान्य नोकरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मध्यमवर्गीय कालिंदीच्या प्रेमात पडतो आणि मध्यमवर्गीय मुलाच्या भूमिकेत स्वतःला ढाळून कालिंदीशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न कसा करतो याचे कथेत वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक मुलीसारखेच कालिंदीचेही एक स्वप्न आहे आणि ते म्हणजे चांदणीच्या गाडीत बसण्याचे, गुलमोहर मधील चांदणी ही कथा म्हणजे कालिंदीचे स्वप्न, तिची आणि रोहितची भेट आणि त्यांच्यातील प्रेम. 
या मालिकेत प्रमुख पात्राची भूमिका साकारणारा आरोह वेलणकर सांगतो, “ही अगदी वेगळी कथा आहे. झी युवा युथफूल आणि फ्रेश संकल्पनेसाठी प्रसिद्ध आहे आणि मला विश्वास आहे अशा प्रकारच्या कथेशी अनेक तरुण प्रेक्षक रिलेट करू शकतील. या चॅनेलने डेलीसोपच्या रुटीनला फाटे फोडत एपिसोडिक स्टोरीज प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत आणि त्यामुळेच गुलमोहर ही मालिका इतरांपेक्षा वेगळी आहे. प्रेम हा युनिवर्सल विषय आहे जो सगळ्यांचा आवडता आहे. मी गुलमोहर आणि आमचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचे आभार मानतो की त्यांनी मला या कथेतील रोहितचे पात्र साकारण्याची संधी दिली. मला वाटते की चांदणीचा विषय हा खूप चांगला आहे आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे मात्र नक्की.”
रोहित आणि कालिंदीला त्यांचे नाते पुढे नेण्यासाठी कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? त्यांची कुटुंबे त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतील का?
याची उत्तरे प्रेक्षकांना गुलमोहर मालिकेत मिळणार आहेत. 
Web Title: Mountaineer Mount Velankar and Mugdha Chafekar will be seen in 'Gulmohar'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.