मौनी रॉय परफॉर्म करणार 'या' रिएलिटी शोच्या फायनलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:30 AM2019-01-31T06:30:00+5:302019-01-31T06:30:00+5:30

टीव्ही आणि चित्रपटांतील आपल्या अप्रतिम नृत्य आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात मौनी रॉयने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

Mouni Roy, gives a dancing ode to Bollywood’s evergreen dancing divas on Dance Plus 4 Grand Finale | मौनी रॉय परफॉर्म करणार 'या' रिएलिटी शोच्या फायनलमध्ये

मौनी रॉय परफॉर्म करणार 'या' रिएलिटी शोच्या फायनलमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देमौनीने अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहेमौनी रुपेरी पडद्यावर आयटम साँग करताना दिसणार आहे

टीव्ही आणि चित्रपटांतील आपल्या अप्रतिम नृत्य आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात मौनी रॉयने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. डान्स+4’च्या अंतिम फेरीत मौनी परफॉर्म करणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरच्या उत्कृष्ट नृत्यांगणांना आदरांजली वाहण्यासाठी मौनी रॉय त्यांच्या काही गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. त्यात वैजयंतीमाला यांच्या ‘चढ गयो पापी बिछुआ’ पासून रेखा यांच्या ‘इन आँखों की मस्ती में’ पर्यंत आणि श्रीदेवींच्या ‘कांटे नहीं कटते ये दिन’ पर्यंतच्या अनेक गाण्यांवर ती नृत्य सादर करणार आहे.

 मौनीने अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता मौनी रुपेरी पडद्यावर आयटम साँग करताना दिसणार आहे. हे गाणे 'केजीएफ' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

'केजीएफ' चित्रपटात जॅकी श्रॉफ व संगीता बिजलानी यांचा गाजलेला चित्रपट 'त्रिदेव' मधील 'गली गली में फिरता है' हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे.या चित्रपटात मौनी रॉय यशसोबत आयटम साँगवर ठुमके लगावताना दिसणार आहे. या गाण्यात मौनी तीन लूकमध्ये दिसणार आहे आणि ती यशसोबत थिरकताना दिसणार आहे. हे पार्टी साँग असून हे गाणे तनिष्क बागची यांनी रिक्रिएट केले आहे.

Web Title: Mouni Roy, gives a dancing ode to Bollywood’s evergreen dancing divas on Dance Plus 4 Grand Finale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.