The most famous villain in the 'double' series is the most famous villain of Balwant Ballal | ​'दुहेरी' मालिकेतील बलवंत बल्लाळ प्रेक्षकांना वाटतोय सर्वांत स्टायलिश खलनायक

आजपर्यंत खलनायक म्हणजे धिप्पाड, पोट सुटलेला, दाढी-मिशा असलेला अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे. मात्र, स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' या मालिकेने या समजाला छेद दिला आहे. या मालिकेतील बलवंत बल्लाळ हा मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वांत स्टायलिश खलनायक आहे. अभिनेता अशोक शिंदे यांची व्यक्तिरेखा बलवंत बल्लाळ प्रेक्षकांची दाद मिळवत आहे.
मुळात बलवंत बल्लाळ या व्यक्तिरेखेचा 'दुहेरी' मालिकेतील प्रवेशच २०० भागांनंतर झाला. मात्र, अल्पावधीतच आपल्या स्टाईल कोशंटमुळे बलवंत बल्लाळ लोकप्रिय झाला. अगदी वेशभूषेपासून ते त्याच्या वागण्या-बोलण्यात असलेली सहजता त्याचे वेगळेपण अधोरेखित करत आहे. हावभाव, हसणं, उठण्या-बसण्याच्या पद्धती यांतून ही व्यक्तिरेखा वेगळी ठरत गेली. 'कुठलीही भूमिका माझ्याकडे आल्यानंतर ती सकारात्मक आहे की नकारात्मक याचा मी पहिल्यांदा विचार करतो. त्यानुसार बलवंत बल्लाळचाही विचार केला. मात्र, ही भूमिका काहीशी वेगळ्या पद्धतीने साकारावी असे मला वाटत होते. त्यामुळे दिग्दर्शकाशी चर्चा करून काही लकबी ठरवल्या. त्याचे वावरणे, त्याचे कपडे हे खलनायकापेक्षा अँटी-हिरो म्हणून उठून दिसतात. त्यामुळे या व्यक्तिरेखेला एक ग्रेस मिळाली आणि हा खलनायक स्टायलिश झाला, जो कधीच टेलिव्हिजनवर पाहायला मिळाला नव्हता,' असे अशोक शिंदे यांनी सांगितले.
अशोक शिंदे हे त्यांच्या फिटनेसविषयी प्रचंड जागरूक असल्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे. याविषयी ते सांगतात, 'नटाचे शरीर हे त्याचे माध्यम असते. त्यामुळे आपल्या शरीराची, दिसण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण स्क्रीनवर दिसणार असल्याने आपण चांगलेच दिसले पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे मी रोज एक तास न चुकता व्यायाम करतो. त्याशिवाय आहारावरही लक्ष देतो. आजच नाही, गेली कित्येक वर्षं मी हे करतो आहे. चांगल्या फिटनेसमुळे मी फ्रेश राहतो. त्याचा फायदा मला भूमिका साकारताना होतो.' 
बलवंत बल्लाळ (अशोक शिंदे), त्याचा मुलगा विक्रम बल्लाळ (अंगद म्हसकर) आणि नातू दृश्यांत सूर्यवंशी (संकेत पथक) या तीन व्यक्तीरेखांतील नातं पुढे कसे उलगडतं, हे प्रेक्षकांना दुहेरी या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

Web Title: The most famous villain in the 'double' series is the most famous villain of Balwant Ballal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.