The most challenging events that Rubina has made in the series 'Reality of power existence' | 'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिकेत रूबिनाने साकारला सगळ्यात आव्हानात्मक प्रसंग

सामाजिक नियमांशी लढणाऱ्या आणि किन्नरांना जीवनात आदर मिळेल अशी आशा फुलवणारा 'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिका त्याच्या हटके कथानकामुळे सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. सौम्या आणि हरमन यांच्या प्रमुख भूमिका करणाऱ्या लाडक्या रुबिना दिलाइक आणि विवियन देसना यांच्या भूमिकांना वेगवेगळे वळण देणारी ही मालिका आता एका नव्या ट्रॅकवर जाणार आहे.त्यामुळे रसिकांनाही वेगळा ट्वीस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे.त्यांच्या प्रेमाची परिक्षा घेतानाचा एक ट्रॅक रसिकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. सौम्या अरविंद पूजा मध्ये सामील होण्याचा निर्णय घेते. सौम्याला स्विकारणारा हरमन किन्नर समाजाच्या ही जुनी परंपरा प्रकाशात आणणाऱ्या पूजेच्या विरोधात असतो. हा सीन अगदी काटेकोरपणे चित्रीत करण्यासाठी आणि त्यात अस्सलपणा आणण्यासाठी हा प्रसंग चित्रीत करताना  यात 70 खरे किन्नर घेतलेले आहेत.तसेच या शोच्या निर्मात्यांनी आकर्षक रुबिना साठी एक अतिशय देखणा पेहेराव सुध्दा निवडला आहे.अतिशय महागडी,लाल बनारसी साडी घातलेली दिसणार असून त्याची प्रेरणा अनुष्का शर्माने तिच्या लग्नात घातलेल्या साडी वरून घेतलेली आहे.सौम्याचे पात्र साकारणा-या रुबिना दिलैक ने सांगीतले, “अरविण देवाच्या लग्नाचे प्रतिक असलेली पूजा हा किन्नर समाजाच्या एक ठळक पूजाविधी आहे ज्यात ते त्यांच्या पुढच्या जन्मात स्त्री म्हणून जन्माला येण्यासाठी देवाची प्रार्थना करतात.सौम्याला तिचे हरमनजी शी असणारे नाते अनंतकाळासाठी कायम ठेवण्याची इच्छा आहे पण तिला माहित नाही की या पूजेमुळे त्याच्या मनात असणारे तिच्या विषयीचे प्रेम आणि आदर डळमळीत होणार आहे.विस्तारीत कलाकारांसह चित्रीकरण करणे खूपच आव्हानात्मक होते आणि एका बाजूने प्रेरणादायी सुध्दा होते आणि या शोमध्ये आम्ही चित्रीत केलेल्या खूप अवघड प्रसंगातील एक नक्कीच आहे असे रूबिनाने सांगितले.

Also Read:टीव्ही इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण करण्याची रूबीना दिलाइकची अशीही धडपड?

आतापर्यत विविधांगी भूमिकेतून  लोकांसमोर आलेल्या रूबीना या ग्लॅमरस फोटोशूटला सोशल साईटवर भरभरून प्रतिसाददेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे.आगामी काळात रूबीना वेगवेगळ्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहितीही मिळतेय. त्यामुळे आगामी भूमिकेत झळकण्याआधी तुर्तास तिचे हे फोटोशूट चाहत्यांच्या नजरा आकर्षित करण्यास यशस्वी ठरत आहे.काही दिवसांपूर्वीच रुबीना दिलाइकने  इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बिकनीत असलेले काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो रुबीनाचा बॉयफ्रेंड अभिनव शुक्लाने काढले होते. तेच फोटो सोशलमीडियावर शेअर करत  रूबीनाने  बॉयफ्रेंड अभिनव शुक्लाचे भरभरून कौतुकही केले  होते. आता पुन्हा एकदा अभिनव शुक्लाकनेच तिचे हे फोटोशूट केले असल्यामुळे ती पुन्हा एकदा अभिनवचे गोडवे गाताना दिसतेय. 
Web Title: The most challenging events that Rubina has made in the series 'Reality of power existence'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.