‘नजर’मध्ये मोनालिसा बनली ‘डायन!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:46 PM2018-07-16T15:46:38+5:302018-07-16T15:46:56+5:30

या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे.

Monalisa to play Daayan on StarPlus’ Nazar | ‘नजर’मध्ये मोनालिसा बनली ‘डायन!’

‘नजर’मध्ये मोनालिसा बनली ‘डायन!’

googlenewsNext

भोजपुरी अभिनेत्री आणि बिग बॉस या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन-१० मध्ये झळकलेली मोनालिसा आता वेगळ्याच अंदाजात रसिकांच्या समोर येणार आहे.विशेष म्हणजे आता ती हॉट अाणि सेक्सी अंदाजात नसून डायन बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान, मोनालिसाने या शोच्या शोमधील लूकचे तिचे बरेचसे फोटोही इन्स्टाग्रामवर अपलोड केले. या सर्व फोटोमध्ये मोनालिसा जबरदस्त दिसत आहे. शिवाय ती या शोमध्ये हॉटनेसचा तडका लावताना दिसेल याचे संकेतही तिने दिले आहेत. 

या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे. यात अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असून ते या डायनची शक्ती किती ताकदवान आहे, ते उघड करतील. याविषयी मोनालिसा सांगते की, “या मालिकेत एका डायनची भूमिकेत मी रसिकासमोर येणार आहे.त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे.मालिकेतील प्रसंग हे कोणत्या तरी दुर्गम ठिकाणी घडत नसून ते माणसानी गजबजलेल्या शहरी वस्त्यांमध्ये आणि आजच्या काळात घडतात.यातील मोहनाचे सैंदर्य आणि तिच्या रूपाभोवती असलेल्या वलयामुळे ही भूमिका स्विकारली.मुळात तिच्या आरस्पानी सौंदर्यामुळे पुरुष घायाळ होतात आणि दुसर-यांना संमोहित करण्याच्या शक्तीमुळे ती इतरांकडून तिला हवी ती कामं करवून घेते. 

मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिश्वास आहे. तिने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.परंतु बिग बॉसच्या सीजन १० मुळे तिच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे.कारण या शोमधूनच तिला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. मोनालिसाने शोच्या दरम्यान तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूतसोबत लग्न केले होते. अनेकांनी मोनालिसाच्या या लग्नाला पब्लिसिटी स्टंट ठरवले होते. पण मोनालिसा व विक्रांतचे हे लग्न केवळ ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढवण्यासाठी नव्हते तर त्यांनी खरोखरीच प्रेक्षकांना साक्षी मानत लग्न केले होते. या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. विक्रांतही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करतो. 
 
 

Web Title: Monalisa to play Daayan on StarPlus’ Nazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.