Mohsin Khan and Shivangi Joshi on tv’s Most Desirable list of 2019 | ‘मोस्ट डिझायर्ड' यादीत मोहसिन आणि शिवांगीचा समावेश
‘मोस्ट डिझायर्ड' यादीत मोहसिन आणि शिवांगीचा समावेश

ठळक मुद्दे मोहसिन खान 2019 च्या ‘मोस्ट डिझायर्ड'पुरुषांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे

स्टार प्लस’वरीलये रिश्ता क्या कहलाता है!’ या लोकप्रिय मालिकेतील मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांनी प्रेक्षकांवर भुरळ घातली  आहे. या मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान 2019 च्या ‘मोस्ट डिझायर्ड'पुरुषांच्या यादीत दुसऱ्या, तर नायराची भूमिका रंगविणारी शिवांगी ही ‘मोस्ट डिझायर्ड महिलां’च्या यादीत सहाव्या स्थानावर होती. मालिकेतील या दोघांचे अपूर्व नाते आणि प्रेक्षकांच्या इच्छेनुसार हे स्थान त्यांना देण्यात आले आहे. या किताबामुळे खूपच आनंदित झालेला मोहसिन खान म्हणाला, “सर्वात हवाहवाशा पुरुषांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे मला माझा गौरव झाल्यासारखं वाटतं. माझे चाहते आणि प्रेक्षकांमुळे कार्तिक हे नाव घरोघरी पोहोचलं असून नेहमीप्रमाणेच त्यांनी माझ्यावर प्रेमाचा आणि प्रशंसेचा वर्षाव केला आहे. यामुळे प्रेक्षकांचं अधिक जोमाने मनोरंजन करावं आणि अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मला मिळते. माझ्या या यशात ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेच्या यशाचा मोठा वाटा आहे. सर्वात हवाहवासा पुरुष म्हणून गणलो गेल्याबद्दल मी अत्यंत आनंदी झालो आहे.”

या यादीत नव्याने प्रवेश केलेली शिवांगी जोशी म्हणाली, “सर्वात हवीहवीशी वाटणाऱ्या महिलांच्या यादीत माझा समावेश झाल्यामुळे मी अत्यंत आनंदात आहे. माझे चाहते आणि प्रेक्षकांनी माझ्या नायराच्या व्यक्तिरेखेवर प्रेम आणि प्रशंसेचा वर्षाव केला आहे. या यादीत समावेश होणं ही मोठी गौरवाची गोष्ट असून प्रेक्षक यापुढेही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव सुरूच ठेवतील, अशी मला आशा वाटते.” 

कार्तिक आणि नायरा हे प्रेक्षकांवर आपली मोहिनी कायम राखून असले, तरी या मालिकेच्या कथानकात लवकरच अनपेक्षित वळणे येणार आहेत.


Web Title: Mohsin Khan and Shivangi Joshi on tv’s Most Desirable list of 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.