Mohit Ranne disclosed about his relationship with Munni Roy | मोहित रैनाने केला त्याच्या आणि मौनी रॉयच्या नात्याविषयी खुलासा

मोहित रैना आणि मौनी रॉय गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांनी देवों के देव महादेव या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या दरम्यान या दोघांमध्ये सूत जमले. ते दोघे अनेकवेळा एकत्र पाहायला मिळतात. अनेक वर्षांच्या नात्यानंतर ते दोघे आता लग्न करणार असल्याच्या देखील बातम्या येत आहेत. ते पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण आता एक वेगळी बातमी मीडियात गाजत आहे. आता त्यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा आहेत.
मौनी रॉयने क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत काम केले होते. या मालिकेपासून तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. छोट्या पडद्यावर अनेक भूमिका साकारल्यानंतर मौनी आता मोठ्या पडद्याकडे वळली आहे. ती अक्षय कुमारसोबत गोल्ड या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. मौनीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर तिने मोहितसोबत ब्रेकअप केले असल्याचे म्हटले जात होते. पण या चर्चेला आता मोहितने पूर्णविराम दिला आहे. त्याने नुकत्याच एक वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, लोकांना जेव्हा एखाद्याची प्रगती आणि त्याचा आनंद पाहावत नाही त्यावेळी लोक अशाप्रकारच्या चर्चा करतात. तसेच त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतात. आज मौनीला जे काही यश मिळाले आहे ते तिच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीमुळे मिळालेले आहे. तिने आज केलेल्या प्रगतीबद्दल मला तिचा अभिमान आहे. ही तर केवळ एक सुरुवात आहे. मौनीला तिच्या कामावर फोकस करायला देणे आज गरजेचे आहे. 

Also Read : हा मौनी रॉयचा गोल्ड चित्रपटातील लुक आहे का?
Web Title: Mohit Ranne disclosed about his relationship with Munni Roy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.