Mohit Malik said, "Aditya had to start selling difficult times during the difficult period of time | ​मोहित मलिकने सांगितले, कठीण काळात आदितीला विकावे लागले होते तिचे दागिने

झी टीव्हीवर शनिवार-रविवार प्रक्षेपित केला जाणाऱ्या चॅट शो 'जझबात...संगीन से नमकीन तक'ने रोहित आणि रोनीत रॉय, अदा खान, दिव्यांका त्रिपाठी, धीरज धूपार, राखी सावंत, बरुन सोबती, करण पटेल, आशका गोराडिया आणि इतर अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या जीवनाचा अतिशय जवळून आणि वैयक्तिक दृष्टीक्षेप सादर केला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात छोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक असलेला मोहित मलिक सहभागी होताना दिसणार आहे. तो या कार्यक्रमात अभिनेत्री पूजा बॅनर्जी सोबत आणि सूत्रसंचालक राजीव खंडेलवाल यांच्याबरोबर हलकाफुलका संवाद साधणार आहे.
या भागादरम्यान मोहितने आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढली आणि आदितीने एका मजबूत आधारस्तंभासारखं त्याच्याबरोबर खंबीरपणे उभं राहून त्याला संकटांना सामोरे जाण्यास कशी मदत केली ते सांगितले. आपल्या भूतकाळातील एका कठीण प्रसंगाचं वर्णन करताना मोहित भावनिक झाला. तो सांगतो, "आदिती आणि माझं लग्न झालं, तेव्हा आम्ही आर्थिकदृष्ट्या एवढे स्थिर नव्हतो. आदितीला आमचा खर्च भागवण्यासाठी तिचे दागिने विकावे लागले होते. तिने मला पाठिंबा देण्यासाठी आपल्या कारकिर्दीचा त्याग केला आणि मी तिच्या या सर्व बलिदानांबद्दल तिचा सदैव ऋणी राहेन. मी आज येथे आहे फक्त तिच्या पाठिंब्यामुळेच." मोहितने आपल्या सहचारिणीचे आभार मानले, तर आदितीनेही त्याला आश्चर्यचकित करण्यासाठी शोमध्ये भाग घेतला. आदिती पुढे म्हणाली, "मी आमच्या जीवनातील तो टप्पा अत्यंत सकारात्मकतेने घेतला आणि त्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला."
मोहित आणि आदितीचा अफलातून ताळमेळ प्रेक्षकांना एक आनंददायी अनुभव नक्कीच देईल. या कार्यक्रमात ते दोघे त्यांच्या आयुष्यातील अनेक रोमँटिक गोष्टी शेअर करणार आहेत. तसेच पूजा बॅनर्जी आणि तिचा होणारा जोडीदार कुणाल वर्मा हे देखील अनेक मजेशीर उपक्रमांमध्ये भाग घेऊन सर्वांचे मनोरंजन करणार आहेत. जझबात...संगीन से नमकीन तक’ या कार्यक्रमाचा हा भाग देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : जजबात… संगीन से नमकीन तक या कार्यक्रमात या कारणामुळे एजाज खानला आवरले नाहीत त्याचे अश्रू...
Web Title: Mohit Malik said, "Aditya had to start selling difficult times during the difficult period of time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.