This is Mohabbatey's audience in the series to see Diwali Tripathi's new look | ​ये है मोहब्बते या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार दिव्यांका त्रिपाठीचा नवा लूक

ये है मोहोब्बते ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडतात. पण त्यातही इशिताची भूमिका साकारणारी दिव्यांका त्रिपाठी ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे. प्रेक्षकांची आवडती दिव्यांका प्रेक्षकांना ये है मोहोब्बते या मालिकेत एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील तिचा नवा लूक हा खूप वेगळा असून सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील झिनत अमानच्या लूकसारखा हा लूक असणार आहे. या लूकवर मालिकेच्या टीमने प्रचंड मेहनत केली आहे. 
ये है मोहब्बते या मालिकेत सिम्मी आणि तिच्या दुष्ट कारस्थानापासून आपला प्रियकर रमण आणि त्याच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी इशिता हे नवे रूप धारण करणार आहे. आपला प्रियकर रमणला पुन्हा न भेटण्याचे भल्ला यांना दिलेले वचन कसे पूर्ण करायचे या विवंचनेत सापडलेली इशिता एका हरयाणवी स्त्रीच्या वेशभूषेत मालिकेत आता दिसणार आहे. ती कामवाल्या बाईचे रूप घेऊन त्यांच्या घरी येणार आहे. विशेष म्हणजे इशिताने ही सारी योजना शगुनच्या साथीनेच आखलेली आहे. सिम्मीपासून रमणचे रक्षण करण्यासाठी इशिता आणि शगुन एकत्र आल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
इशिताचा ये है मोहोब्बते या मालिकेतील हा नवा लूक झीनत अमानच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटातील रूपा या व्यक्तिरेखेसारखा असणार आहे. इशिताच्या अर्ध्या चेहऱ्यावर भाजल्याचे व्रण असल्यामुळे तिला पटकन कोणाला ओळखता येणार नाहीये. दिव्यांका तिच्या या नव्या लूकसाठी खूपच उत्सुक आहे. 
ये है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तसेच या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. या मालिकेने नुकताच काही वर्षांचा लीप घेतला असून लीपनंतर या मालिकेच्या कथानकात अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 

Also Read : ही बालकलाकार आहे कोट्यवधीची मालकीण
Web Title: This is Mohabbatey's audience in the series to see Diwali Tripathi's new look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.