Mithun Dahiya Elvis presents tribute to 'Dance India Dance'! | ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये मिथुनदांनी वाहिली एल्विस प्रिस्लेला श्रध्दांजली!

‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी कार्यक्रमातील स्पर्धक दर आठवड्याला आपला अप्रतिम नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. दर आठवड्याला हे स्पर्धक कोणता तरी नवा आणि अगदी वैशिष्ट्यपूर्ण नृत्यप्रकार सुंदर रीतीने सादर करून परीक्षक आणि रसिकांची मने जिंकत आहेत.येत्या वीकेण्डला प्रेक्षकांसाठी एक नेत्रपर्वणी ठरणार आहे; कारण कार्यक्रमाचे ग्रॅण्डमास्टर मिथुन चक्रवर्ती आपल्या ‘डिस्को डान्सर’ या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करणार आहे.या भागात नृत्यपारंगत स्पर्धक पियूष गुरभेले हा मिथुनदांच्याच ‘डिस्को डान्सर’ या गाण्यावर आपले बहारदार नृत्य सादर करीत होता.त्याचे कौशल्य पाहून ग्रॅण्डमास्टर मिथुनदा तसेच इतर परीक्षकही खुश झाले.आपल्या नृत्यानंतर पियूषने या गाण्यातील मूळ डान्सर मिथुनदांनाच मंचावर येऊन या गाण्याच्या तालावर आपल्यासोबत नृत्य करण्याची विनंती केली.त्याची ही विनंती मिथुनदांनी तात्काळ आणि आनंदाने मान्य केली आणि त्यानंतर या दोघांनी या गाण्यावर अतिशय चैतन्यपूर्ण आणि अप्रतिम नृत्य केले,जे पाहून सर्वांचीच बोटे तोंडात गेली. या गाण्याने निर्माण केलेल्या सळसळत्या उत्साहाने मास्टर मार्झी, मिनी आणि मुदस्सर हेही मंचावर आले आणि त्यांनी या दोघांना अभिवादन केले.या गाण्याच्या चित्रीकरणाच्या सुखद स्मृती जागविताना मिथुनदांनी सांगितले, “माझे चाहते हे नेहमीच मला ‘डिस्को डान्सर’ या गाण्यामुळे ओळखतात आणि त्यांच्या दृष्टीने हे गाणं आणि मी वेगळे होऊच शकत नाही.हे गाणं माझ्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे कारण या गाण्यातील अनेक पदन्यास आणि हालचाली या मी थोर नर्तक आणि गायक एल्विस प्रिस्ले याच्या नृत्यावरून उचलल्या आहेत. या गाण्यात मी माझ्या कमरेला दिलेला झटका ही एल्विसच्या प्रसिध्द नृत्य पदन्यासाची भ्रष्ट कॉपी आहे, असं मी मानतो.माझ्या दृष्टीने एल्विस हा सदैव नृत्याचा बादशहाच राहील.”मिथुनदांच्या नृत्याशिवाय प्रेक्षकांना इतर स्पर्धकांच्याही बहारदार नृत्याचे दर्शन घडेल.तेरी मेरी कहानीवरील दीपक हुलसुरेचा धाडसी पदन्यास,भीगी भीगी सी है यादें गाण्यावरील संकेत गावकरचे नृत्य आणि सिलसिला यह चाहत का गाण्यावरील नैनिकाचे नृत्यकौशल्य रसिकांना मंत्रमुग्ध केल्याचे पाहायला मिळाले.

Also Read:मिथुन चक्रवर्तीसाठी एका स्पर्धकाने आणली ही खास वस्तू

आपल्या मुलाला इतक्या भव्य मंचावर नृत्य सादर करताना पाहून दीपकचे पालकही आनंदित झाले. इतकेच नव्हे, तर त्यांनी मिथुन चक्रवर्तीला खास घरी बनविलेली भाकरी भेट म्हणून दिली. मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी आपण स्वत: ही भाकरी बनविली असून त्यांना आपल्या हाताने ही भाकरी खाऊ घालण्याची आपली इच्छा असल्याचे सांगून त्यांनी मिथुन चक्रवर्तीला मंचावर येण्याची विनंती केली. त्यांच्या या आपलेपणाच्या आणि प्रेमाच्या भावनेने मिथुन चक्रवर्ती भारावून गेला आणि त्याने अस्सल मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली भाकरी आपल्यासाठी ‘डान्स इंडिया डान्स’च्या कार्यक्रमात आणल्याबद्दल दीपकच्या पालकांचे आभार मानले. 
Web Title: Mithun Dahiya Elvis presents tribute to 'Dance India Dance'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.