Mister perfectionist Aamir Khan's choreographer helped | मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानची या कोरियोग्राफरला मदत

छोट्या पडद्यावरील डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शो सध्या रसिकांची मनं जिंकतो आहे. या शोमधील स्पर्धकांचे एकाहून एक सरस आणि अदभुत डान्स परफॉर्मन्स रसिकांना भावतायत. या शोमध्ये नुकतंच ऑस्कर विजेता प्रसिद्ध कोरियोग्राफर लाँजिनस फर्नांडिस याने हजेरी लावली. स्लमडॉग मिलिनेअरमधील जय हो, ओ साया आणि पप्पू कान्ट डान्स साला अशा बॉलिवूडच्या एकाहून एक दमदार गाण्यातील डान्स स्टेप्ससाठी लाँजिनस प्रसिद्ध आहे. डान्स इंडिया डान्सच्या सहाव्या सीझनमध्ये स्पर्धकांचं परीक्षण करण्यासाठी लाँजिनसने हजेरी लावली.डान्स आणि स्वतःवरील विश्वास,भावना आणि मनोरंजन अशा विविध गोष्टींचा विचार करुन तो स्पर्धकांना जज करणार होता. यावेळी स्पर्धकांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स रसिकांना पाहायला मिळाले. याशिवाय पप्पू कान्ट डान्स नावाचेही सेगमेंट होतं. यांत कशाचीही पर्वा करता बिनधास्त डान्स करण्याची सूट स्पर्धकांना होती. या सेगमेंटच्या निमित्ताने लाँजिनसने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पप्पू कान्ट डान्स साला या गाण्याला कोरियोग्राफ करतानाचा किस्सा त्याने सांगितला. ज्यावेळी पहिल्यांदा या गाण्याच्या डान्स स्टेप्स पाहिल्या त्या बदलून टाकाव्या असा विचार आला होता असं त्याने यावेळी सांगितलं. मात्र त्याचवेळी मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानने आपल्याला आहेत त्या स्टेप्स तशाच ठेवण्याचा सल्ला दिल्याची आठवण त्याने सांगितली. याच डान्स स्टेप्स रसिकांना आवडतील असा विश्वास त्याने मला दिला असंही लाँजिनसने नमूद केले. यानंतर या गाण्याला मिळालेली लोकप्रियता पाहता आमिरचे शब्द खरे ठरले होते आणि त्यावेळी ही इंडस्ट्री कशी चालते हे समजले असं लाँजिनसने आवर्जून सांगितलं. यावेळी मिथुनदा, मास्टर मर्झी आणि मुदस्सर यांनी साडी नेसून धरलेला ठेकाही सा-यांच्या कौतुकाचा विषय ठरला. शिवाय एलफिन्स्ट चेंगराचेंगरी दुर्घटनेवर भाष्य करणारा परफॉर्मन्ससुद्धा रसिकांच्या काळजाला भिडणारा ठरला. मात्र लाँजिनसला आमिरने दिलेली कौतुकाची थाप आणि त्याबद्दलचा किस्सा सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

Also Read:अमृता खानविलकरने शेअर केला फोटो,तर चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स!

'डान्स इंडिया डान्स' या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळे सिझन हिट झाले आहेत.आता या कार्यक्रमाचा सहावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.इतर सिझनप्रमाणे 6व्या सिझनला रसिकांची चांगलीच पसंती मिळत आहे.भारतातील विविध शहरात या शोसाठी ऑडिशन घेतले गेले होते. 
Web Title: Mister perfectionist Aamir Khan's choreographer helped
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.