Miriam Khan - In the film Ashutosh Gowarikar's film will be turbulent after this series of reporting live? | ​मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेनंतर देशना दुगाड झळकणार आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटात?

मालिकांमधील अभिनय पाहून अनेक कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. मरियम खान या मालिकेतील एका कलाकाराला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.
स्टार प्लसवरील मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेतील कथानक आणि मांडणी यामुळे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांची भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेत बालकलाकार देशना दुगाड मरियम खानची मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. या मालिकेमुळे ती या वयातच स्टार बनली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. तिला बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात फातिमा सना शेखच्या लहानपणीची भूमिका ती साकारणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त देशनाला आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटासाठीही ऑफर आली आहे. 
भोपालच्या पार्श्वभूमीवर मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह या मालिकेची कथा आधारलेली असून या मालिकेपूर्वीही देशनाने 'इस प्यार को क्या नाम दूँ' आणि 'बाल कृष्ण' या मालिकेत काम केले आहे. मरियम खान या मुलीचा जगाकडे पाहण्याचा निरागस दृष्टिकोन आपल्याला ताज्या हवेच्या झुळुकीसारखा ताजेतवाने करणारा ठरणार असल्याची मालिकेच्या टीमला खात्री आहे. सध्या अनेक मालिकेत बच्चेकंपनीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा बच्चेकंपनीला आपण लहान भूमिका करताना पाहिले आहे. मात्र आता तसे नसून बच्चेकंपनी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'कुल्फी कुमार बाजेवाला' मालिकेतही आकृती शर्मा ही सात वर्षाची चिमुरडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'कुल्फी कुमार बाजेवाला'प्रमाणेच 'मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह'ही मालिका देखील प्रेक्षकांचे प्रेम जिंकत आहे. 

Also Read : लुब्ना सलिम सांगतेय मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी
Web Title: Miriam Khan - In the film Ashutosh Gowarikar's film will be turbulent after this series of reporting live?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.