Minority 'My Sai' won the audience's mind | अल्पवधीतच ‘मेरे साई’मालिकेने जिंकली प्रेक्षकांची मनं

पडद्यावरील आपल्या दैवताची पूजा करणार्‍या चाहत्यांच्या गोष्टी आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत. मान्यवर व्यक्तिना दैवत मानणार्‍या आणि त्यांच्या शैलीची आणि लकबींची नक्कल करणार्‍या या देशात अशा घटना अगदी सामान्य आहेत. कधी कधी अशी एखादी गोष्ट दिसते जी थेट आपल्या मनाला भिडते. अशीच एक घटना सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई’ मालिकेच्या सेटवर प्रकाशात आली. साई बाबांच्या भूमिकेत अबीर सूफीचा अभिनय पाहून प्रभावित झालेल्या एका चाहतीने आपले नाव बदलून रीबा केले. रीबा हे अबीर नावाचे उलट इंग्रजी स्पेलिंग होते. ही चाहती अलीकडेच सेटवर आली होती आणि सर्व कलाकारांना भेटली होती. अबीरला भेटून ती सद्गदित झाली. अबीरला विचारले असता त्याने सांगितले, “ज्या दिवसापासून या मालिकेचे प्रसारण सुरू झाले आहे, तेव्हापासून प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम आणि स्नेहाचा वर्षाव केला आहे. अनेक प्रेक्षक सेटवर भेटायला आले आहेत आणि साई बाबांचे चरित्र पाहताना त्यांना किती आनंद होतो हे त्यांनी सांगितले आहे. अलीकडेच प्रेक्षकांमधील एक महिला मला भेटली व तिने सांगितले की तिने तिचे नाव रीबा करून घेतले आहे, जे माझ्या नावाच्या उलट होते. ही कृती मला भिडली आणि मी हेलावून गेलो.”

मालिकेच्या आगामी कथानकात कुलकर्णीने मोतीशी हातमिळवणी केली आहे, जो अंमली पदार्थाची विक्री करणारा आहे आणि शिर्डीला आला आहे. अनेक गावकर्‍यांना अंमली पदार्थांचे व्यसन लागले आहे आणि या अनिष्टापासून गावाची सुटका करणे हे केवळ साई बाबांच्या हाती आहे. साई गावकर्‍यांना कशी मदत करतील? कुलकर्णी आणि मोती यांचा कुटिल हेतु हाणून पडण्यात ते यशस्वी होतील का?

'मेरे साई' ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई बाबांच्या आयुष्यातील अनेक घटना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत साईंची भूमिका अबीर सुफी, झिपरीची भूमिका धृती मंगेशकर साकारत आहे. तसेच तोरल रासपुत्र, वैभव मांगले यांसारखे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. अबीर सूफी, तोरल रासपुत्र आणि वैभव मांगले या मुख्य कलाकारांच्या कलात्मक अभिनयामुळे मालिकेने लोकांची मने जिंकली आहेत.
Web Title: Minority 'My Sai' won the audience's mind
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.