Message to the audience of 'Dil Dosti Doabaara' will take place | 'दिल दोस्ती दोबारा'मालिका घेणार रसिकांचा निरोप

छोट्या पडद्यावर सध्या विविध लोकप्रिय मराठी मालिका रसिकांचा निरोप घेत आहेत. काही दिवसांपूर्वी 'चुकभूल' द्यावी घ्यावी या मालिकेनं रसिकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या जागी आता 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे. आता आणखी एक रसिकांची आवडती मालिका छोट्या पडद्यावरुन एक्झिट घेणार आहे.  मैत्रीच्या नात्यावर आधारित असलेली मालिका 'दिल दोस्ती दोबारा' आता रसिकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी येत्या १४ ऑगस्टपासून 'जागो मोहन प्यारे' ही नवी विनोदी मालिका रसिकांच्या भेटीस येणार आहे. कोणत्याही गंभीर, विचार करायला लावणा-या मालिकांपेक्षा रसिकांना हलक्या फुलक्या, विनोदी, खळखळून हसवणा-या आणि धम्माल मनोरंजन करणा-या मालिका पाहायला आवडतात. हीच बाब लक्षात घेऊन 'जागो मोहन प्यारे' ही नवी विनोदी मालिका लवकरच रसिकांचं मनमुराद मनोरंजन करण्यासाठी दाखल होत आहे. मालिकेचं शीर्षक हिंदी वाटत असलं तरी मालिका मराठी रसिकांचं तुफान मनोरंजन करणार आहे. सध्या या मालिकेचा प्रोमो छोट्या पडद्यावरील रसिकांना भावतोय.या मालिकेतून एका बिच्चा-या नव-याची कथा आणि व्यथा विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.विनोदी भूमिका साकारत सिनेमा,मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेता अतुल परचुरे हे या मालिकेत नव-याची भूमिका साकारत आहेत. नव-याला आपल्या तालावर नाचवणा-या पत्नीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी साकारली आहे. 'राधा ही बावरी' या मालिकेत राधा ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री श्रृती मराठे ही सुद्धा या मालिकेत विशेष भूमिका साकारत आहे. श्रृती या मालिकेत बायकोपासून हैराण असलेल्या पतीला मदत करणा-या परीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता बिच्चारा पती, त्याची बायको आणि परीची गोष्ट पाहून खळखळून हसण्यासाठी सज्ज व्हा.
Web Title: Message to the audience of 'Dil Dosti Doabaara' will take place
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.