The memories of sharing my relationship with Tomar Rasputran on Makar Sankranti of this series | मेरे साई या मालिकेतील तोरल रासपुत्रने मकर सक्रांतीच्या निमित्ताने शेअर केल्या या आठवणी

मकर संक्रात जवळ आली असल्याने सगळेच हा सण साजरा कऱण्याची जय्यत तयारी करत आहेत. मेरे साई या मालिकेत सध्या तोरल रासपुत्र बायजी बाईची भूमिका साकारत आहे. तोरल ही मुळची गुजरातची असल्याने तिच्यासाठी मकर संक्रांती हा सण खूप खास असतो. या सणाच्या दिवशी तिच्या घरी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. त्यामुळे या सणाची ती आतुरतेने वाट पाहात असते. अहमदाबादमधील पतंग उत्सव हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर फेमस आहे. मकर संक्रांती या सणाविषयी तोरल सांगते, “गुजरात मध्ये मकर संक्रांतीचा सण उत्तरायण म्हणून ओळखला जातो आणि तो आमच्यासाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा असतो. यंदा माझ्यासाठी दुहेरी सेलिब्रेशन असणार आहे. कारण मी मेरे साई या मालिकेत बायजी बाई ही एक अस्सल मराठमोळी व्यक्तिरेखा साकारते आहे. मेरे साई या आमच्या मालिकेत अनेक मराठी कलाकार आहेत. या मालिकेत कुलकर्णींची भूमिका साकारत असलेले वैभव मांगले हे त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील मराठीच आहेत आणि त्यामुळे त्यांच्या घरी मकर संक्रांतीला खूपच छान तीळाचे पदार्थ बनवले जातात. सेटवरील आम्हा सर्वांसाठी घरी केलेले तीळाचे पदार्थ ते घेऊन येणार आहेत. मी गुजराती असल्यामुळे आमच्या घरी संक्रांतीची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. आमच्याकडे मित्रमंडळी आणि नातेवाईक येणार आहेत आणि आम्ही खास गुजराती पदार्थ आणि मिठाई तयार करणार आहोत. मला खरे तर अहमदाबादला आंतरराष्ट्रीय पतंग उत्सव बघण्यासाठी जायचे होते. पण मी माझ्या मालिकेच्या चित्रीकरणात प्रचंड व्यग्र असल्याने मला अहमदाबादला जाता येणार नाहीये. मला तिथे जाऊन तिकडच्या पतंग बाजारात लावलेल्या रंगीबेरंगी पतंग बघायच्या होत्या आणि महास्पर्धा देखील बघायची होती. यावर्षी मला अहमदाबादला जाणे शक्य नसले तरी पुढच्या वर्षी तरी तिथे जायचेच असे मी ठरवले आहे. यंदा मी घरी आणि सेटवर साधेपणाने हा सण साजरा करणार आहे.”

Also Read : वैभव मांगले आणि ​अबीर सूफी यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे घेतले आशीर्वाद 
Web Title: The memories of sharing my relationship with Tomar Rasputran on Makar Sankranti of this series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.