Meet the guests of 'The Voice of India Kids' | 'द व्हाईस ऑफ इंडिया किड्स'चे पर्व दुसरे रसिकांच्या भेटीला

कोवळे स्वर सज्ज झाले आहेत प्रेक्षागृह निनादून टाकण्यासाठी;  आणि परीक्षक सिद्ध आहेत त्यांच्या आवाजाला दाद देत आपल्या आसनांवरून मागे वळून पाहण्यासाठी! हे सारे घडणार आहे द व्हॉइस इंडिया किड्स या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाच्या मंचावर. भारतातील छोट्या प्रतिभावान गायकांची कलाका गुणांना वाव मिळण्यासाठी व्हॉइस इंडिया किड्सच्या आणखी एका अद्भूत पर्व रसिकांच्या भेटीला येत आहे. भारताला आपला सर्वात प्रभावशाली युवा आवाज मिळवून देण्यासाठी आघाडीचा गायक आणि संगीतकार – हिमेश रेशमिया; हसतमुख आणि अद्वितीय प्रतिभेचा गायक शान, भावविभोर आवाजाचा गायक आणि संगीतकार पापोन आणि सर्वात तरुण प्रशिक्षक बनलेली गायिका पलक मुछल अशा चार जबरदस्त प्रशिक्षकांची साथ या पर्वाला लाभली आहे. 'व्हॉइस इंडिया किड्स'चे दुसरे पर्व ११ नोव्हेंबर  पासून  सुरू होणार आहे. दिव्यांग मुलांमधील प्रतिभेला संधी देण्यापासून ते भारताच्या दुर्गम भागांतील मुलांच्या आजवर कधीही ऐकिवात न आलेल्या संघर्षाचे कौतुक करण्यापर्यंतच्या कित्येक कहाण्या व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वातून उलगडणार असून भारतील प्रतिभावान युवा गायकांनी जपलेले त्यांची कला  पाहणे रंजक ठरणार आहे.  ७ ते १४ या वयोगटातील मुले आपल्या आवाजाच्या जोरावर प्रशिक्षकांना मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडतील असे एक से बढकर एक परफॉर्मन्स सादर करताना झळकतील.  या सुंदर सांगितिक सफरीमध्ये या छोट्या गायकांचे दोस्त बनून प्रसिद्ध अभिनेता व सूत्रसंचालक जय भानुशाली व त्याचा साथीदार निहार गिते हे दोघे या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत. बडे मियां आणि छोटे मियां म्हणावे अशी त्यांची  कामगिरीही आवर्जून पहावी अशीच असणार आहे.

 या कार्यक्रमाचा एक भाग बनल्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना हिमेश रेशमिया म्हणाला, द व्हॉइस इंडिया किड्स हा एक असा मंच आहे जिथे संगीताचे खरे सार शोधले जाते व ज्यातून अनेक प्रतिभावान मुलांना आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. मला स्वत:ला मुलांच्या सान्निध्यात राहणे खूप आवडते. त्यांच्याकडून मला सतत प्रेरणा मिळत असते. त्यांच्या निर्मळ मनांचे प्रतिबिंब त्यांच्या गाण्यातही उमटलेले दिसते. व्हॉइस इंडिया किड्सचा भाग असणे हा माझ्यासाठी चांगला अनुभव आहे आणि या नव्या विलक्षण संगीतसफरीवर निघण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. तर शान म्हणाला, जिथे यशाची शिडी चढण्यासाठी स्पर्धकांना आपल्या आवाजाची ताकद पुरेपूर सिद्ध करावीच लागते अशा एका कार्यक्रमामध्ये परतणे ही माझ्यासाठी नेहमीच आनंदाची बाब असते. व्हॉइस इंडिया हा कार्यक्रम माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण त्यातून असे संगीत आणि आवाज लोकांसमोर येतो जो तुमच्या  हृदयाला भिडतो.या कार्यक्रमाचे इतके भाग पार पडले तरीही त्यात दिसून येणारा स्पर्धकांचा उत्साह आणि त्यांची प्रतिभा यात खंड पडलेला नाही आणि या पर्वामद्येही अशाच अलौकिक प्रतिभेचा अनुभव घेण्याची मी वाट पाहत आहे.

या कार्यक्रमातील आपल्या पदार्पणाविषयी पापोन म्हणाला,व्हॉइस इंडिया हा सगळ्यात आगळ्यावेगळ्या रिअॅलिटी शोजपैकी एक आहे. हा एक असा शो आहे जिथे लाखो लोकांना आपली कला सादर करण्यासाठी सुयोग्य असा मंच प्राप्त होतो. यापूर्वीही मी काही सांगितिक रिअॅलिटी शोजचा भाग राहिलो आहे, तिथे आपली कला सादरही केली आहे. पण परीक्षकाच्या खुर्चीत बसण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि व्हॉइस इंडिया किड्सचा भाग बनण्यासाठी खरोखरीच खूप उत्सुक आहे. यानिमित्ताने संगीतातील माझे ज्ञान संगीतक्षेत्रातील या युवा प्रतिभावंतांना देता येईल व आपली स्वप्ने साकार करण्याच्या त्यांच्या प्रवासात एक प्रशिक्षक म्हणून त्यांची तयारी करून घेता येईल अशी मला आशा आहे. या कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करताना पलक मुछल म्हणाली, ताकदवान सादरीकरणांतून अतीचिकित्सक बुद्धीही कशी प्रभावित करता येते हे सिद्ध करण्यासाठी व्हॉइस इंडियासारखा मंचच हवा. इथे स्पर्धकांच्या गटांची निवड करताना परिक्षकांचे डोळे बांधलेले असतात. त्यामुळे आवाज वगळता आणखी कोणत्याही बाह्य गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही. हृदयाला भिडणारे आवाजच तेवढे या स्पर्धेमध्ये पुढच्या पायरीवर जाऊ शकतात. आपल्यातील गानकौशल्याचा शोध घेण्यासाठी व ते सिद्ध करण्यासाठी मिळणारी हीच संधी मला नेहमीच सन्मानाची वाटत आली आहे. चाकोरीबाहेरचा दृष्टिकोन घेऊन सुरू होणा-या द व्हाइस इंडिया किड्सच्या दुस-या पर्वामध्ये भविष्याला कलाटणी देणा-या कित्येक कहाण्या उलगडणार आहेत. जिथे या क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तींकडून गाण्याचे धडे गिरवण्याची संधी मुलांना मिळणार आहे.
Web Title: Meet the guests of 'The Voice of India Kids'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.