Meera and Vijaychi offscreen chemistry | मीरा आणि विजयची ऑफस्क्रिन केमिस्ट्री

उडान मालिकेतील चकोर आणि सूरजची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरते आहे. चकोर आणि सूरजच्या लग्नाच्या नात्यात तणावाचे स्थिती निर्माण झाली असतानाही  त्यांच्या दोघांमधील प्रेमाचे नाते अजूनही टिकले आहे. सुरुवातीला हे दोघे सेटवर एकमेंकाशी फारच क्वचित बोलायचे. त्यामुळे असे आदांज बांधला जायचा की पडद्यावर यांच्या जोडीला प्रेक्षक पसंत करणार नाहीत. मात्र हळूहळू चोकर आणि सूरजमधली मैत्रीचे नाते फुलत गेले. कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागेसुद्धा हे एकमेंकाचे चांगले मित्र-मैत्रिण झाले आहेत. चकोरची भूमिका साकारत असलेल्या मीराचा विश्वास आहे की सूरजकडे अर्थात विजेंद्रकडे अभिनयाच्या तांत्रिक कौशल्याची चांगली जाण आहे. मीरा सांगते, तो नेहमीच मला माझा सीन्स आणखीन चांगला कसा होईल याबाबतचा सल्ला देतो आणि जेव्हा त्यांने दिलेल्या सूचनेचा नेहमीच मला अभिनयात फायदा झाला आहे. तो माझा अतिशय जवळचा मित्र झाला आहे. आमच्या मालिकेची यशाकडे होणारी घौडदौड पाहुन मला खूप कौतुक वाटते आहे.    
 
तर मीरा बद्दल सांगताना विजेंद्र सांगतो,''मीराला तिची स्क्रिप्टवर नेहमीच लक्षात राहते. त्यामुळे मीरा असताना मी माझ्या ओळी विसरलो तरी मला काळजी वाटत नाही. ती तिच्या तसेच माझ्याही ओळी लक्षात ठेवते हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मला विश्वास आहे की आम्ही एकमेकांना पूर्णपणे पूरक आहोत, आम्हाला यासाठी सेटवर चिडवले जाते. मीरा की याददाश्त   आणि विजय की सूझ बूझ या लोकांच्या म्हणण्याने आम्हाला पडद्यावर आणि पडद्याच्या  मागे सुद्धा चांगले काम करण्यासाठी एक चांगली जोडी बनविले आहे. 

Web Title: Meera and Vijaychi offscreen chemistry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.