माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या संगीतकाराचे हे नवे गाणे तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:25 PM2019-03-04T17:25:45+5:302019-03-05T13:24:22+5:30

युथ या आर.विशालने संगीत दिलेल्या चित्रपटाची गाणी स्वानंद किरकिरे सोनू निगम यांसारख्या दिग्गजांनी गायली आहेत. मराठीत मिळालेल्या यशानंतर तो आता हिंदीकडे वळला आहे.

Mazya Navryachi Bayko serial music director has launched his own album | माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या संगीतकाराचे हे नवे गाणे तुम्ही ऐकले का?

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेच्या संगीतकाराचे हे नवे गाणे तुम्ही ऐकले का?

ठळक मुद्देमी अनेक मराठी गाणी बनवली आहेत. मराठीत मिळालेल्या या यशानंतर काही तरी वेगळे करण्याचे मी ठरवले. हिंदी गाण्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल असा विचार करून मी हिंदी गाणे लिहिले, गायले आणि त्याला संगीत देखील दिले.

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. पण त्याचसोबत या मालिकेचे शीर्षकगीत देखील प्रेक्षकांन प्रचंड आवडते. या गाण्याला संगीत आर.विशाल आणि जगदीश यांनी मिळून दिले असून या गाण्याचे बोल देखील त्यांचे आहेत. आता आर. विशाल आणि जगदीश वेगवेगळे काम करत आहेत. गेली दहा वर्षं आर. विशाल मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्याने स्लॅमबुक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्याचे नाव प्रसिद्धीझोतात आले. युथ या त्याने संगीत दिलेल्या चित्रपटाची गाणी स्वानंद किरकिरे सोनू निगम यांसारख्या दिग्गजांनी गायली आहेत. मराठीत मिळालेल्या यशानंतर तो आता हिंदीकडे वळला आहे. त्याने एक स्वतःचा हिंदी गाण्याचा व्हिडिओ बनवला असून या गाण्यातील गीत त्यानेच लिहिले आहेत. तसेच या गाण्याला संगीतही त्यानेच दिले आहे. विशेष म्हणजे हे गाणे त्यानेच गायले असून या गाण्यात त्याने अभिनय देखील केला आहे.

त्याच्या या नव्या इनिंगविषयी आर. विशाल सांगतो, मी आजवर अनेक मराठी गाणी बनवली आहेत. लोकांचे मला खूप प्रेम देखील मिळाले आहे. मराठीत मिळालेल्या या यशानंतर काही तरी वेगळे करण्याचे मी ठरवले. हिंदी गाण्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल असा विचार करून मी हिंदी गाणे लिहिले, गायले आणि त्याला संगीत देखील दिले. या गाण्याची निर्मिती दीपक दळवी यांची असून दिग्दर्शन कुमार स्वप्निल यांनी केले आहे. मी या दोघांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांना मी हा विचार सांगितल्यावर त्यांनी लगेचच यासाठी होकार दिला. जानेवारीमध्ये हे गाणे आम्ही रेकॉर्ड केले आणि ते चित्रीत देखील केले. या गाण्यात मी अभिनय देखील केला असून माझ्यासोबत अबोली गिऱ्हे या गाण्यात तुम्हाला पाहायला मिळत आहे.

आर. विशालच्या ये जुनून हे गाणे सोशल मीडियावर लाँच होऊन केवळ आठ दिवस झाले असून लाखोंहून अधिक व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत. 

Web Title: Mazya Navryachi Bayko serial music director has launched his own album

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.